▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇   
  ════════════════
 *🤾‍♂ उडी मारु या...!!!*
             *🔣गणित शिकू या...!!!*
━━━━━━━━━━━━━━━
       उडी मारु या...!!!
           गणित शिकू या...!!!
या उपक्रमातून हसत खेळत गणिती क्रियाचा सराव घेता येतो.

*🔹गणिती खेळासाठी कार्यवाही/सुचना🔸*
====================
🥀 वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे 5×4आकाराचे 20 जमिनीवर आयत(चौकट) आखून घ्यावे.
🥀 आयातात 0 ते 9 ही संख्या क्रम बदलुन दोन वेळा लिहावी.

       वरील आकृतीच्या साह्याने पाच गणिती खेळ /उपक्रम आपणास घेता येतात.

*🎊उपक्रम पहिला👇*
==================
👉 दोन दोन मुलांच्या जोड्या कराव्यात.
👉 त्यातील एका मुलाने चौकटीतील एका संख्येवर उडी मारावी. व दुसऱ्या मुलानी ती संख्या वाचावी किंवा एकाने संख्या सांगावी व दुसऱ्याने त्या संख्येवर उडी मारावी.

        *🏃‍♀उपक्रम दुसरा🤾‍♂*
        ================
🥀 एकाने चौकटीतील एका संख्येवर उडी मारावी व संख्या वाचावी.
🥀दुसर्‍या मुलाने चौकटीतील कोणत्याही एका संख्येवर उडी मारावी व संख्या वाचावी.
🥀 तिसऱ्या मुलाने दोघांनी वाचलेल्या /उडी मारलेल्या चौकटीतील संख्या पैकी लहान मोठी संख्या कोणती ते सांगावे.

उदाहरणार्थ :- समजा माझा पहिलीचा वर्ग आहे.
रामने 8 या अंकावर उडी मारली शामने 7 या अंकावर उडी मारली तर 8 व 7 मधील मोठी संख्या कोणती किंवा मोठी संख्या कोणती सांगावयास सांगावे.
🥀 या उपक्रमात तीन विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.

         *🏃‍♀उपक्रम तिसरा*👩‍👧‍👦
====================
🥀 या उपक्रमात तीन जण सहभागी होऊ शकतात.
🥀त्यातील एका मुलाने दोन संख्या सांगावी.
🥀 ती संख्या तयार होण्यासाठी एकाने दशक स्थान तर एकाने एकक स्थानावर उडी मारून संख्या तयार करावी.

        *🤾‍♂उपक्रम चौथा*🙋
====================*
🥀 या गणिती खेळात तीन मुलांचा करून खेळता येतो.
🥀एका मुलाने चौकटीतील एक संख्येवर उडी मारावी व दुसऱ्या मुलाने दुसर्‍या संख्येवर उडी मारावी तिसऱ्या मुलाने बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चारही घटकाचा सराव घेता येतो.
🥀 त्याचसोबत एकाने बेरीज व एकाने वजाबाकीचे उदाहरणे सोडवता येतील किंवा दोघांनीही योग्य उत्तर संख्येवर उडी मारता येतील.
( गणिती क्रिया करताना उदाहरण जवळ योग्य ते चिन्ह ठेवण्यात यावे. )

        *🥇उपक्रम पाचवा*🏃‍♀
=====================
🥀 या खेळात दोन मुलांना सहभागी होता येते.
🥀एकाने मनात संख्या धरावी.
🥀दुसर्‍या मुलांने ती संख्या ओळखण्यासाठी चौरसातील एका एका संख्येवर फिरत राहावे.
🥀हा मुलगा संख्येजवळून दुर जात आसेल तर मनात संख्या धरलेल्या मुलांने टाळी आवाज व वेग वाढवावा आणि संख्येचा जवळ येत आसेल तर टाळी आवाज व वेग कमी करावा. बरोबर संख्येवर उभे टाकल्यास टाळी बंद करावी.
🥀संख्या मोठ्यानी वाचावी व मनात धरलेल्या मुलांनी संख्या सांगावी.

       या गणिती खेळात गणिती ज्ञान तर मिळतेच त्याचबरोबर शारीरिक विषयाला देखील सांगड घालता येते.

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════

  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments