~~~~~~~ *srk* ~~~~~~~
मित्रहो शिक्षक समितीचा थोडासा पुर्व इतिहास समजून घेऊ या,
मा.भानुदास वालचंद शिंपी (भा.वा.शिंपी) गुरुजी यांचा जन्म उंदीर खेडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे झाला. दोन भाऊ दोन बहिणी असे त्यांचे कुटुंब होते भा.वा.शिंपी गुरुजींचा जन्म ३ ऑक्टोबर १९३१ वार शनिवार रोजी झाला . १९४८ मध्ये भा.वा.शिंपी गुरुजींना प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली. प्रथम नेमणूक खडकवाडी येथे मिळाली १९५५ मध्ये त्यांचा विवाह पातोंडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील पाचवी शिकलेल्या कलावती देवी यांच्याशी झाला,त्यावेळी मुंबई राज्य असल्याने शिक्षकाची नोकरी करीत असताना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'मुंबई राज्य विद्यार्थी शिक्षक समितीची 'स्थापना भावा शिंपी गुरुजी व वि.भा.येवले गुरुजी यांनी स्थापन केली. पहिल्यांदा त्यांनी 'ड्युटी पे' चा प्रश्न हाती घेतला. प्रत्येक शिक्षकाकडून २५ पैसे वार्षिक वर्गणी गोळा करून संघटना चालवली १४ नोव्हेंबर १९६१ मध्ये पुण्याच्या शनिवार वाड्याच्या समोर मारुती मंदिरात ड्युटी पे च्या प्रश्नासाठी आमरण उपोषण केले पाचव्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेले त्यावेळी एस.एम.जोशी आणि आणि तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई या दोघांनी शिंपी गुरुजींची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले तेव्हा त्यांनी उपोषण सोडले .नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी नागपूरला येणार होत्या तेव्हा शिक्षकांच्या प्रश्नासाठी ७००० शिक्षकांचा मोर्चा काढण्याचे नियोजन केले परंतु जमावबंदी आदेश लागू केल्याने त्यांना मोर्चा काढता आला नाही परंतु तत्कालीन आयुक्तांनी भा.वा.शिंपी गुरुजींची (शिष्टमंडळाची )भेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी घालून दिली 'ड्युटी पे' चा प्रश्न शिंपी गुरुजींनी पंतप्रधानाच्या कानावर घातला त्याच वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री एम. सी. छागला यांच्या सोबतही या प्रश्नाची चर्चा केली, अनेक शिक्षकांच्या आग्रहाखातर *२२ जुलै १९६२ वार रविवार पुणे येथे* गोखले हॉलमध्ये एक हजार शिक्षकांच्या उपस्थित मुंबई राज्य विद्यार्थी शिक्षक समिती विसर्जित करून *शिक्षकांच्या व शिक्षणाच्या प्रश्न साठी, त्याग आणि सेवा न्यायाची चाड व अन्यायाची चीड, लोकशाही तत्वाचा अंगीकार करणारी सर्व जातीधर्माना सोबत घेऊन चालणारी "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती" ची स्थापना करण्यात आली.* या कामात येवले गुरुजी, आंग़्रे, जान राङ्रीक्स, नवीन, माने, हजारे,पुरी ,कांळगे,सांडभोर ,किलेदार,मसादे,राणे,काळे,कराड,इत्यदींचे सहकार्य लाभले. *पहिले राज्याअध्यक्ष म्हणून दत्तो वामन पोतदार कार्याध्यक्षपदी भा.वा. शिंपी गुरुजी आणि सरचिटणीस पदावर येवले गुरुजी यांची निवड करण्यात आली.*
शिक्षक समितीच्या नेतृत्वात अनेक आंदोलने करून महाराष्ट्र सरकार कडून शिक्षकांना पेन्शन व ग्रेच्युटी मान्य करून घेण्यात शिक्षक समितीला यश मिळाले त्यानंतर शिक्षक समितीने शिक्षकासाठी वेतन मंडळाची मागणी केली त्यासाठी दिनांक २९ नोव्हेंबर १९६४ रोजी ३००० शिक्षकांचा नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला याची दखल महाराष्ट्र सरकारने घेऊन बडकस आयोगाची स्थापना केली. *शिक्षक समितीच्या दुसऱ्या राज्य अधिवेशनात भा.वा.शिंपी गुरुजी राज्याध्यक्ष झाले.* १९६४ मध्ये त्यांनी *"शिक्षक मित्र" नावाचे पाक्षिक सुरु केले त्यातून शिक्षणाचे व शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडू लागले.* शिक्षक समितीची चळवळ वेगाने सुरू होती जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांना भा.वा. शिंपी गुरुजींच्या कार्याचा त्रास होऊ लागला म्हणून भा.वा. शिंपी गुरुजींना अधिकारी व पदाधिकारी त्रास देऊ लागले म्हणूनच शिंपी गुरुजींनी १९६५ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला घराचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले म्हणून त्यांच्या पत्नीने ट्रेनिंग करून शिक्षिकेची नोकरी धरली शिंपी गुरुजींनी राजीनामा दिल्यामुळे पूर्णवेळ संघटनेचे काम जोमाने सुरू झाले. एकदा शिक्षणमंत्री यांना भेटण्यासाठी नागपूरला जायचे होते, जवळ पैसे नव्हते,मुलाच्या फी साठी ठेवलेले पैसे पत्नीला माहीत नसताना घेऊन गेले आणि नागपुरात त्याची चप्पल तुटली तेव्हा अनवाणी पायाने मंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहीती मा. चंद्रकांत अणावकर सरांनी सांगीतली. १९७० मध्ये शिंपी गुरुजींनी शिक्षक समितीच्या व्यासपीठावरून शिक्षकांना बोनसची मागणी केली व ती मान्य करुन घेतली शेवटी १९७७ मध्ये शिक्षक समितीचे पाचवे राज्य अधिवेशन सोलापूर येथे झाले त्या अधिवेशनात शिंपी गुरुजींनी राज्याध्यक्ष पद सोडले व वि. भा.येवले गुरुजींना राज्याध्यक्ष आणि सरचिटणणीस राजाराम माळी यांना केले. स्वत: मार्गदर्शक म्हणून राहीले. शेवटी डिसेंबर १९७७ मध्ये हडपसर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी मध्ये अखेरचे भाषण केले १४ डिसेंबर १९७७ च्या बेमुदत संपात शिक्षक समिती पूर्ण ताकदीनिशी संपात उतरली शेवटी २ जानेवारी १९७८ रोजी घरी येत असताना दुपारी बारा एक च्या दरम्यान शिंपी गुरुजी चक्कर येऊन पडले त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले शेवटी १२ जानेवारी १९७८ रोजी अकरा वाजता भा.वा. शिंपी गुरुजींची प्राणज्योत मावळली,
*सत्कर्माच्या दिव्य फुलांनी ! देव पूजिला ज्यांनी !अनंत तयाची स्मरण यात्रा ! कधीं न सरे मरणांनी!*
पुढे त्याच जोमाने मा.आरडे साहेब,मा.कै.देवाजी नाना गांगुर्डे,मा.नाना जोशी, मा.बोरसे बापू,विद्यमान राज्याध्यक्ष मा.उदयजी शिंदे या सर्वानी अत्यंत चांगले काम केले पुढे करीत आहेत मा.शिवाजीराव साखरे,मा.विजयजी कोंबे, मा राजेंद्र खेडकर,मा राजेंद्र पाटील,मा.ज्योतिराम पाटील,मा.आबा शिंपी सह भरपूर नावे घेता येतीलच.. या शिक्षक समितीच्या महायज्ञात महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते निष्ठेने काम करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात शिक्षक समितीच्या कार्यक्षम शाखा कार्यरत आहेत. लाखो शिक्षक ,शिक्षक समितीच्या कार्यात सहभागी आहेत .
====================
संकलन-सतीश कोळी, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख,
*शिक्षक समिती औरंगाबाद*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

1 Comments
अतिशय सुंदर 🙏🙏
ReplyDelete