*मा.ना.आशिषजी शेलार साहेब (मंत्री- शालेय शिक्षण ) यांचेशी चर्चा...*
काल मंगळवारी (ता. २३ जुलै) नगरपालिका, महानगर पालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्या बाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. यात नगरपालिका, महानगर पालिकांच्या प्राथमिक शाळांतील प्राथमिक शिक्षकांचा समावेश नसल्याचा पार्श्वभूमीवर आज बुधवारी (ता. २४ जुलै) *राज्याध्यक्ष मा. उदयराव शिंदे* आणि *नपामनपा आघाडी प्रमुख मा. सुधाकर सावंत* यांनी मुंबईत जाऊन *मा.ना.आशिषजी शेलार* यांची भेट घेतली. त्यांचेशी नगरपालिका, महानगर पालिकांच्या प्राथमिक शाळांतील प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्या बाबत चर्चा झाली. यावेळी नगरपालिकांच्या माध्यमिक शिक्षकांसाठी ३ जुलै ला आदेश काढलेत मात्र प्राथमिक शिक्षकांसाठी आदेश काढण्यास होणारा विलंब व भेदभाव संबंधाने तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.
यासंबंधाने *मा.डॉ.वंदना कृष्णा मॅडम (अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण), मा. मनीषा म्हैसकर (प्रधान सचिव, नगर विकास), मा. चारुशीला चौधरी (उपसचिव, शालेय शिक्षण), मा. धुमाळ साहेब (अवरसचिव)* यांचेशी चर्चा झाली. नगरपालिका, महानगरपालिकांच्या प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लावण्याबाबतची नस्ती मा. अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण) यांच्या मान्यतेने पुढील २ दिवसात नगर विकास विभाग व तेथून वित्त विभागाकडे जाईल. *नगरपालिका, महानगपालिका कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शिक्षकांना सुद्धा सातवा वेतन आयोग अविलंब लागू होईलच अशी निःसंदिग्ध ग्वाही मा. मंत्री महोदय तथा सर्व संबंधित अधिकारी महोदयांनी दिली आहे.*
मा.ना. आशिषजी शेलार साहेबांना- राज्यातील प्राथमिक शाळा, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संबंधाने निवेदन देऊन सविस्तर चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती करण्यात आली. MS-CIT, शाळेत दाखल वय ६ वर्षे पूर्णच्या संबंधाने येत असलेल्या अडचणी, शालेय पोषण आहार, गणवेश-उपस्थिती भत्ता, वरिष्ठ-निवड श्रेणी शासनादेश, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या जागा, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण, विषय पदवीधर श्रेणी अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. *मा. मंत्री महोदयांनी चर्चेसाठी वेळ देण्याबाबत आश्वस्त केले.*
आज मंत्रालयात मा. राज्याध्यक्ष श्री. उदयराव शिंदे यांचेसह, मा. सुधाकर सावंत (नपामनपा आघाडी प्रमुख), कोल्हापूर शहर शाखेचे कार्याध्यक्ष मा. सुभाष धादवड उपस्थित होते...
माहितीसाठी-
विजय कोंबे (राज्य सरचिटणीस)

0 Comments