माझी शाळा,माझे उपक्रम* 〇 स्वरचिन्हांची किमया

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇
════════════════
*📚🤔 स्वरचिन्हांची किमया 🤔📚*
━━━━━━━━━━━━━━━━
सध्याला शाळा बंद पण शिक्षण चालू हा शासनाचा उपक्रम चालू आहे. त्याअंतर्गत मुले अभ्यास पण करीत आहेत. त्या उपक्रमाला जोड म्हणून मुले हसतखेळत अभ्यासात रममाण व्हावे हाच मुख्य उद्देश समोर ठेवून आपण *_"स्वरचिन्हाची किमया"_* हा उपक्रम घेवू शकता. चला तर मग आपण या उपक्रमांविषयी जाणून घेवू घ्या.
*_🥀उपक्रमाचा मुख्य उद्देश🥀_*
====================
_स्वरचिन्हांची किमया या उपक्रमाचा उद्देश हा दिलेल्या अक्षरांना वेगवेगळी स्वरचिन्हे लावून हसतखेळत जास्तीत जास्त शब्द तयार करणे हाच आहे._

*_🥀स्वरचिन्हांची किमया या भाषिक उपक्रमासाठी सुचना🥀_*
~~~~~~~~~~~~~~~~~
_💫 स्वरचिन्हाची किमया हा उपक्रम एक किंवा जास्त मुले खेळु शकतात._
💫 या मुलांना दोन अक्षरजोडी द्यायची व त्यापासून जास्तीत जास्त शब्द बनवण्यासाठी सांगावे.
💫दिलेल्या वेळेत जो जास्तीत शब्द बनविला त्या मुलांस किंवा गटास विजय घोषित करुन त्याचा गौरव करावा.
💫 स्वरचिन्हांची किमया भाषिक खेळामुळे मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ होते.
💫 या भाषिक खेळाचा उपयोग आपण भाषा विषयात अप्रगत विद्यार्थ्यांच्या व पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांची मराठी विषयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरते. 

   *_🎼चला तर मग आपण स्वरचिन्हांची किमया हा भाषिक उपक्रमाचा खेळ खेळू या.🎼_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
उदाहरणार्थ :- ख ड हे दोन अक्षर घेतली. 
*_चला तर आपण या दोन अक्षरापासून स्वरचिन्हयुक्त शब्द बनवू या:👉👇_*
_खडा, खाडी, खेडी,खडू, खंडू, खडे, खांड, खेडे, खुडा, खाडा, डेख, डंख. असे अनेक शब्द बनविता येतात._
_मुलांना असे शब्द बनविण्यास मौज वाटते तो हसतखेळत स्वअध्ययनातून आपली शब्द संपत्ती वाढवत आसतो._
       _💫विद्यार्थ्यांना आपण खालील प्रमाणे दोन शब्दाच्या जोड्या द्यावयाच्या व जास्तीत जास्त शब्द तयार करावयास लावावे. या उपक्रमात आपली भुमिका फक्त मार्गदर्शकाची असेल_. 
_१) व, र.  २) ग, र.  ३) त, प.  ४) प, ल. ५) स, र._

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *_रंगनाथ सगर, लातूर_*
       *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
     📞 *_97 63 534721_* 📞
   ════════════════
   ─┅━━♍ 💲🅿━━┅─

Post a Comment

0 Comments