वेध सह्याद्रीचा🚩नळदुर्ग किल्ला







🚩वेध सह्याद्रीचा🚩नळदुर्ग  किल्ला🚩
➖➖➖➖🚩🚩🚩➖➖➖➖
🔴 नळदुर्ग हा उस्मानाबाद जिल्ह्यातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा रहस्यमय किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ *३ कि.मी. लांब* पसरलेली आहे. या तटबंदीत *११४ बुरूज* आहेत. 

🟢 महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण *भुईदुर्ग किंवा भुईकोट* किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे *नळदुर्ग* होय. 

🟡 यामध्ये काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे जसे की *गणपती महाल, लक्ष्मी महाल* हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत.

🔵 *येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे*

🟣 स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास *नळराजा व दमयंती* राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात.. नळ राजाने हा किल्ला बांधला. त्याच्या नावावरुन या किल्ल्यास *नळदुर्ग* हे नाव रुढ झाले. नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधला याचा उल्लेख *तारीख-ए-फरिश्ता* या ग्रंथात आहे. त्यावरुन नळदुर्ग हे नाव रुढ झाले.

🟡 नंतर हा किल्ला कल्याणीच्या *चालुक्य राजाच्या* ताब्यात होता. पुढे तो *बहामनी सुलतानांच्या* ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या *आदिलशहीने* नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे *औरंगजेब* या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी *हैदराबादच्या निजामाकडे सोपवली.*

*🚩किल्ल्यातील पहाण्यासारखी ठिकाणे🚩*

🔴 सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती *मोठ्या भागात खंदक आहे.* त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे.

🟢 किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी *बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात* आणण्यात आला.

🔵 हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्‍यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये *कायमस्वरूपी पाणी साठून रहाते.* त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. 

🟡 खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये *शंभरावर* बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते.

🟣 यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला *नवबुरुज* आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. या भल्याथोरल्या *बुरुजाला नऊ पाकळ्या* आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात. *असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.*

🟡 नळदुर्ग किल्ल्यामधील *जलमहाल* असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. हा बेसाल्ट चा वापर करून बांधलेला आहे , रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्‍या बंधार्‍यामध्ये जलमहाल आहे.

🟢 हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्‍यामध्ये चार मजले आहेत. बंधार्‍याच्या *पोटातील या मजल्यामध्ये* जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे.

🔴 बंधार्‍याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या *खिडक्या नक्षीदार महिरपीने* सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर *फारशी लिपीतील शिलालेख* आहे. शिलालेखात सांगितले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. 

🟡 पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्‍यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना *नर व मादी* अशी नावे आहेत.विशेष म्हणजे या दोन्हीही तुन पडणारे पाणी वेगवेगळ्या रंगाचे आहे ,हिरव्या पाण्याचा मादी ,व पांढऱ्या पाण्याचा नर धबधबा,हे ह्या किल्यातील वैशिष्ट्यपूर्ण आहे 

🟢 नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, *टेहळणीचा उपळ्या बुरूज*, त्यावरील *लांब तोफ*, दरवाजाचा *वक्राकार मार्ग* वगैरेंमुळे चांगलाच लक्षात रहातो

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  

Post a Comment

0 Comments