अन्यायाची चीड , न्यायाची चाड , त्याग आणि सेवा या ब्रीदास अनुसरून विद्यार्थी व शिक्षकांची बाजू घेऊन , सामाजिक भान जोपासत आणि वैचारिक अधिष्ठान कायम ठेऊन २२ जुलै१९६२ पासुन गेली ५८ वर्षे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची वाटचाल सुरू आहे . सर्व मा . पूज्य भा . वा . शिंपी गुरुजी , वि.भा. येवले , जॉन रॉड्रिग्ज , ल.रा. हजारे , आबासाहेब पाटील , कि . वा . निकम , जि.द. पवार , म . द . पुरी , सावळाराम अणावकर , राजाराम माळी , प्रभाकर आरडे . देवाजीनाना गांगुर्डे , नानासाहेब जोशी , काळूजी बोरसे - पाटील अशा अनेकांनी प्राथमिक शिक्षकांच्या त्या - त्या काळात असलेल्या समस्यांच्या निरसनासाठी . विद्यार्थ्यांकरिता शेक्षणिक सुविधा मिळणे तसेच गोरगरीब बहुजनांसाठी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सुविधा प्राप्त होऊन या शाळा टिकण्यासाठी आवश्यकतेनुसार संघर्षासह प्रामाणिक कार्य केले आहे . यातूनच शिक्षक समितीचे कार्य सर्वव्यापी झाले आहे . या कर्तृत्त्व संपन्न वाटचालीत मा . विश्वनाथअण्णा मिरजकर , हनुमंतराव कुभार , चंद्रकांत अणावकर , भाई चव्हाण यासारखे ज्येष्ठ नेहमीच मोलाची भूमिका बजावत आहेत . आज राज्याध्यक्ष उदयराव शिंदे व राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांच्या संयमी प्रेरक नेतृत्त्वात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सेवारत आहे .
दि ४ डिसें१९७७च्या राज्यव्यापी संपात फक्त शिक्षक संघटना म्हणून शिक्षक समितीचे भरीव सहकार्ष व सहभाग होता, तसेच शिक्षक समिती हि बिगर राजकीय संघटना म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे,आज आपल्यापुढे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत . सध्याची ध्येय धोरणे समजून घेतल्यास भविष्यात प्रचंड आव्हाने आपल्यापुढे आहेत . मोजक्या औद्योगिक घराण्यांच्या फायद्यासाठी होत असलेल्या खाजगीकरणाच्या रेट्यात प्रचलीत कामगार कायद्यात केंद्र सरकार जे बदल करू पाहत आहे त्यामुळे सेवाविषयक अनंत अडचणी वाढणार आहे . यापासून शिक्षण क्षेत्रही दूर नाही . बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार केल्यास सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मोडीस काढण्याची पूर्ण तयारी झाली आहे . अशा परिस्थितीत दैनंदिन सेवा विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसोबत येऊ घातलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या अभ्यासपूर्ण तयारीसह संघर्षाचीही शिक्षक समितीची तयारी असते, . शिक्षक बांधवांच्या हिताच्या दृष्टीने धरणे आंदोलने, विधानसभेवर मोर्चा, जुनी पेशंन योजना व ऑनलाईन बदली प्रक्रीया बाबत शिक्षक समिती सदैव कार्यरत आहे, राजकीय हुजरेगिरी , दलाली , फसवेगिरी आणि खोटेपणाचा प्रचार जोमात असण्याच्या काळात शिक्षक समिती आपले दायित्व अत्यंत जबाबदारीने पार पाडण्याचे काम शिक्षक समिती करत आहे, तसेचराज्याच्या प्रत्येक जिल्यात , तालुक्यात शिक्षक समितीच्या शाखा स्थापन असुन औरंगाबाद जिल्हयात सुद्धा ४0 वर्षापासुन शिक्षक समिती शिक्षकांच्या हितासाठी सदैव कार्यरत आहे, औरंगाबाद जिल्हयात शिक्षक समिती बहरत गेली, व गेल्या दोन वर्षापासुन जिल्हा पदाधिकारी काम करत आहोत, तसेच तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यात शाखा कार्यरत आहेत,
शिक्षक समितीच्या केलेल्या आंदोलना मुळे स्तनदा गर्भवती मातांना ऑनलाईन बदतीने अन्याय झालेल्यांना पदस्थापना मिळवूण देणे, Gpf अग्रीम जिल्हास्तरावरून शिक्षकाच्या खात्यात जमा करणे . नवरात्री काळात सकाळ सत्रात शाळा करणे, पदोन्नतीचे, वैदयकिय प्रतिपूर्तिचे प्रश्न, चटो पाध्याय करीता व जुनी पेशंन करीता धरणे आंदोलन अशा प्रकारचे कार्य शिक्षक समितीने अकोला जिल्ह्यात केले आहे,
सतीश कोळी
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख



0 Comments