बायोडाटा....
आज आमच्या मित्राच्या बहिणीला पाहुणे पहायला येणार होते.
आम्ही चार पाच मित्र आनंदात होतो.
आमच्या सगळ्यांची ती लाडकी तायडी होती.
शिकलेली ,लाजरी पण परखड बोलणारी.
आम्ही सगळेजण पाहुण्यांची वाट पहात बसलेले.
आणी आले एकदाचे पाहुणे.
मुलगा चांगल्या नोकरीवर होता.
सर्व शिकलेले घरातले.
पाहुण्यांचा आदर सत्कार झाला.
चहा घेउन आमची तायडी आली.
मुलाच्या चेहर्यावर आनंदाची लहर स्पष्ट दिसत होती.
मुलान् त्याच्या आईकड पाहिलं.
दोघ गालातल्या गालात हसले.
आम्ही सर्व मित्र एका कोपर्यातुन पहात होतो.
त्यांनी मुलगी पसंत असल्याच सांगितल.
आम्ही सर्वजण आनंदी झालो.
मित्राची परीस्थिती साधारण.
दोन एकर शेती .ती पण कोरडवाहु.
दोन बहिणींचे लग्न झालेले.ही सर्वात लहाण .दिसायला सुंदर.स्वयंपाक, भरतकाम,विणकाम,मशीनकाम,सगळ्यात हुशार.
पसंती झाली आता देण्याघेण्यासाठी बैठक बसली.
एवढ्यावेळ आनंदात असणारे मुलीचे वडील गंभीर झाले.
दोन्ही हात जोडुन म्हणाले,माझ्याजवळ देण्यासाठी काहीच नाही.
मुलीच्या लग्नासाठी पोटाला चिमटा देऊन पै पै जमवली.
मी तुमच्या मनासारख फार झाल तर लग्न करु शकतो.
मुलाच्या वडीलांनी हुंड्यासाठी तीन लाख रुपये अन पाच तोळे सोनं सांगीतल.
हां हुं करता करता दोन लाख रुपये अन् दोन तोळे सोन्यावर सोयरीक झाली.
अन् तेवढ्यात नवरा मुलगा मधातच म्हणाला,
मला बुलेट पण पाहीजे.
आमच्या मित्राचे वडील म्हणाले अहो माझी ऐपत नाही.
मी बुलट काही देवु शकणार नाही.
मुलगा काही ऐकेना.
शेवटी आम्ही चारपाच मित्रांनी आपसात चर्चा केली.प्रत्येक मित्रान् विस विस हजार रुपये जमा करायचे .सहा जणांचे एक लाख विस हजार रुपये होतील.
बाकीचे तीस एक हजार ईकडुन तिकडुन व्यवस्था करु.
आमची चर्चा झाल्यावर मी बैठकीत जायला निघालो.
काही हरकत नाही देतो तुम्हाला बुलट सांगण्यासाठी.
मी म्हणालो, काही हरकत नाही. लावा कुंकु.
तेवढ्यात आतुन नवरी मुलगी आली,
म्हणाली,थांब दादा.
यांना सासर्याकडुन बुलट पाहीजे.
आता तर लग्नही झाल नाही, उद्या कदाचीत हे फोर व्हिलर मागतील.
अश्या दुसर्यावर अवलंबुन असणार्या
या मुलासोबत मला लग्नच करायच नाही. मला मुलगा पसंत नाही.
सर्व घरातील वातावरण गंभीर झाल.
पाच मिनीट कुणीच कुणाला काही बोलल नाही.
पुन्हा तायडी म्हणाली,कशाची वाट पहाता उठा आता.
पाहुण्यांची तोंड पहाण्यासाठी झाली होती.
पाहुणे उठले अन् अपमानीत होऊन निघुन गेले.
पहाता पहाता ही चर्चा गावभर पसरली.
जो तो तायडीला शाबासकी देत होता.
मुलगी खुप डेरींगबाज आहे अस प्रत्येक जण म्हणत होता.
पेपरात ही बातमी छापुन आली.
बुलेट मागनार्या मुलाला मुलीने शिकवीला चांगलाच धडा.
ऐके दिवशी मित्राच्या दारात नवीकोरी चारचाकी थांबली.गाडीतुन एक तरुण उतरला.
त्याची आई बाबा.
मी मित्राच्या घरी गेलो.
पाहुण्यांच आदरातिथ्य झाल.
त्या मुलाने डायरेक विषयालाच हात घातला.
मी बाजुच्या गावचा तुमच्या मुलीच धाडस पेपरात वाचल.
मला तुमच्या मुलीशी लग्न करायच आहे.अर्थात तुमच्या परवानगीने.
आणी हो मला बुलट पण नको.
(घरात एकच हशा पिकला.)
मी शेती करतो .माझ्याकड चाळीस एकर शेती आहे.
आई बाबा अन् मी आमच्या तिघांच कुटुंब.
मित्राच्या वडीलांनी होकार दिला.
सगळ्यांना आनंद झाला.
एका मंदीरात जावुन दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले.
आज आमची तायडी सुखात आहे.दोन वर्षाची मुलगी आहे.
संसार सुखात आहे.
आज या गोष्टीला पाच वर्ष झाले.
सकाळी सकाळी जेंव्हा मोबाईल हातात घेतला,
तेंव्हा एका मुलाचा बायोडाटा मला दिसला.
यंदा कर्तव्य आहे.
हा त्याचाच बायोडाटा होता ज्यान् कधीकाळी लोखंडी बुलेटसाठी सोन्यासारखी मुलगी नाकारली होती..
राजकुमार नायक
सवना
9921581444
(आवडल्यास नावासह शेअर करण्यास हरकत नाही)
0 Comments