आपल्या शिरसगावातील सर्व लहान थोर गुरुजनांच्या इच्छेखातर आज आपला *शिरसगाव टीचर्स* नावाचा ग्रुप क्रियेट झाला याचा मला खूप आनंद होत आहे.मी जवळपास 300 ग्रुपवर असुनही हा ग्रुप आगळा वेगळा व जिव्हाळ्याचा ,आपुलकीचा,आपल्या गावचा व आपल्या माणसांचा असल्याने खुपच वेगळेपणा वाटतो.खरः तर याची कल्पना मला सर्वप्रथम रवी चव्हाण सर यांनी दिली होती.त्यांनीही जवळपास 60/65 नावे एकत्र संग्रह करून ठेवली असल्याने सोपे झाले.त्यांनी मला ही विचारणा केली होती माझ्या संपर्कात असलेली बरीच मंडळी होतीच.. आपला हा ग्रुप चांगला नावारूपाला येवो हीच माझीही इच्छा आहे.
मित्रांनो शिरसगावातील माझी यशोगाथा म्हणण्यापेक्षा मनोगत सांगताना मलाही खूप आनंद होतोय जे वास्तव आहे तेच लिहिले.
माझ्या गावाचा,गावातील लोकांचा,गावातील मराठी शाळेचा,गावातील न्यु इंग्लिश स्कूलची शाळेचा अनुभव खुप काही सांगून जातो..गावातील ते वडाचे झाड खूप जुन्या सा-या आठवणी
जाग्या करून जातात,आजही अधूनमधून घरी येताना आपल्या गावाजवळ आल्यावर सहाजिकच मान नमन करायला वाकते. विशेष म्हणजे अक्षय तृतीयाच्या वेळेस लहानपणी खेळत असताना दगडधोंडे खाल्ली, दगडंही मारले, डोकी फुटली, डोकी फोडलीही..ती वेस.. तिथून निघाल्यानंतर खोकली माय ते चिंचेचे झाड..आज जरी मी घाबरत नाही तरी लहानपणी मात्र तिथे चिंचेच्या झाडावर भुत असते हे ऐकलेले होते.आमचे आजी आजोबा घाबरविण्यासाठी सांगत असतील कदाचित.. पुढे गेल्यावर ती खोकली माय.. खोकली माय गावाजवळील पुल,लहानपणी पुल नसलेली नदी मला आजही आठवते.. मग ग्रामपंचायत सुरू होती आणि भलं मोठं आपल्या लहानपणीचा वटवृक्ष..ज्याने आपल्या सर्वांना लहानपतचं मोठं ज्ञानदीप बाळकडू पाजले..डेअरिंग दिली.स्वत्वाची जाणीव करून दिली. उभे कसे राहायचं हे शिकवलं,गावात घुसल्यानंतर गावाचा भला मोठा लाकडी दरवाज्याकडे जाणिवपूर्वक लक्ष जायायचंच .ज्याप्रमाणे पावसाचं पाणी वळूच्या पाऊस येतो तेव्हा जमिनीवर पडल्यप्रमाणे आणि जमिनीचा जसा सुगंध येतो तसा आपल्या मातीतल्या जमिनीचा सुगंध येतो. तसा सुगंध नाकात दरवळतो असो ...
माझेही लहानपणापासूनचे शिक्षण कौलारूच्या जिल्हा परिषद प्राथमिक *विद्यामंदिर* या शाळेत झालं.त्यात विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त व्हायची...आता जि.प.च्या शाळांची नावा काळानुरूप बदलत गेलीत..आमची शाळा,असे रुपांतर झाले. असो...
माझे वडील कडक शिस्तीचे आणि *माझी माय गरीब गाय* वडील जरी सर्विस ला होते नोकरीला होते तरी शाळेचे साहित्य आमच्या जवळ तोडकेमोडकेच असात्रचे.. पण परमेश्वराच्या कृपेने अभ्यासात आमचं भावंडांचं डोकं मात्र चांगलं चालायचं.. पहिलीत सूर्यवंशी गुरुजी, दुसरीत राघोजी गुरुजी, तिसरीत सखाराम गुरुजी,राजधर गुरुजी, आणि चौथीत विनायक गुरुजी,आबा गुरुजी चा सहवास लाभला..स्काँलर्शिपच्या तासाला सर्व प्रश्नांची उत्तरे सांगून झाली.तरीही एक प्रश्न बाबुलाल गुरुजींकडून राहून गेला.त्या प्रश्नांचे मी अचूक उत्तर दिले तेव्हा मला आबा गुरुजींनी खाद्यांवर घेण्यासाठी उचलले..पण मी ही त्यांचा मोठेपणा पाहून फक्त कडेवर येईपर्यंत गेलो..नंतर खाली उतरलो.. हे मी विसरुच शकत नाही... अभ्यासात हुशार होतो तसाच खोड्या करण्यात ही तितकाच अवलिया होतो. हायस्कूलचे मुलं ग्राऊंडवर खो-खो खेळण्यासाठी गोरख अप्पा घेऊन यायचे तेव्हा मी चौथीत होतो मुलं-मुली खाकी पॅन्ट घालून खो खो खेळायचे मी कुतूहलापोटी ते पहायला जायचं त्यांचा एक गडी कमी भरल्यावर गोरख अप्पा मला खेळातं सामावून घ्यायचे आणि चौथी पासूनच मला खेळायचं वेड लागलं आणि चौथी पासून मला ग्राउंडच वेड लागलं कबड्डी खेळण्यासाठी टाकळीला गेलो
चौथीत असताना माझी आई माझा अभ्यास घ्यायची पाचवीला आर.एस.अहिरे सर,सहावीला अहिरे मँडम,सातवीला आहेरराव सर,आठवीला जे.एस.आबा सर. चौधरी सर,डी बी सर शिंपी सर यांनी मला साने गुरूजी कथामालेत ट्रेन केलं.. पाचवी,सातवीला जे.एस.आबांनी इंग्रजी शब्द पाठांतर करायला सांगितले होते.. पाठ न केल्याने मला पहिल्यांदा मार खावा लागला.. पण मात्र दुसऱ्या दिवशी सर्व शब्दार्थ पाठ केल्याचे दिसल्यावर मला इतरांचे शब्दार्थ पाठ घ्यायची जबाबदारी ही आंबानी दिली...सहावीला इंग्रजी चे शहा सरांनी विचारलेला प्रश्न आजही आठवतो..
What is the color of the sky?
The skay is blue हे माझं पटकन उत्तर असायचं.. कथाकथनसाठी उंबरखेड,चाळीसगावला जाऊन नंबर पटकावूनच यायचो.. शाळेतील कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो,वक्रुत्वस्पर्धा असो मी आवर्जून सहभाग घ्यायचो.. त्या कार्यक्रमासाठी मला माझे मोठे बंधू अमन दादा आवर्जून सहभाग घ्यायला लावायचे आमचा अमनदादा खुपच हुशार,, अक्षरही मोत्यासारखे,, त्याचा मित्रपरिवार ही खूप हुशार होता. मनोज चौधरी,संजय एकनाथ चव्हाण,प्रदीप चव्हाण हे त्यांची मित्र मंडळी यांची नावं आवर्जून घेतो.. दादा सांगायचा तू हुशार मुलांच्या संगतीत रहा,सत्संग धर.. मला शाळेत असताना दिनकर धनगर,विजय पाटील,मांगो तुकाराम,ही जवळची मंडळी,जयदिप चव्हाण,पुरुषोत्तम,दशरथ,माझ्या पेक्षा लहान जरी होती तरीही त्यांच्याशी चांगली गट्टी जमली..
अन्य रिकाम्या वेळात मी गंभीर खैरणार, भगवान गरुड यांच्या कडे रेडिओ वरची त्यांची नावे ऐकण्यासाठी एक-एक तासही थांबत असू..भास्कर जुगराज पाटील यांचा लहान भाऊ अशोक याबरोबरही त्यांच्या घराच्या धतावर गोधडींचे घर बनवून रात्रभर अभ्यास ही करत असू..
घरी खार्या (खा-या) नावाचा एकच बैल होता..खुपच मारका बैल.. पण मी एका हातात पुस्तक व एका हातात त्या बैलाचा कासरा घेऊन चारायला जात असे..लहानपणी महादू न्हावीची ती आंब्याची कोरडी कोय टक्कलवर घासण्याची आठवणही आहे.जवळच रवी सरांचे घर होते..त्यांच्या घरात सर्व देव देवतांचे फोटो लालवेले होते,मी सांगितल्या प्रमाणे थोडा खोडकरच असल्याने मी रवी सरांना प्रश्न विचारायचो..की तुमच्या घरात सर्व देवदेवतांचे फोटो लालवेले असुनही एक देव मात्र नाही... त्यांनी खुप विचार केला तरी त्यांना उत्तर सापडत नव्हते.. पण शेवटी उत्तर मिळाले.. त्यांच्या घरात *कपील देव* चा फोटो नव्हता.मी एकदा विटी दांडू बनवतांना आर.के.पाटील यांचा भाचा सुनील(पिंट्याची) करंगळी च कु-हाडीने कापली होती.तेव्हा तर आप्पानी मला गल्लीत पायाने तुडवलं...कौतीक आण्णाचा नातू मंदिरात हनुमान चालीसा म्हणताना अजूनही आठवतो.लहानपणी आंबा उतरावयालाही 50 रु.रोजाने गेलो.पाठच्या चारीचे कामही केले.प्रकाश बळीराम पाटील यांची एक पच्चर सायकल अडोशाला उभी असायची.गुरुजी ड्युटीवर गेल्यावर प्रकाश व मी त्या पच्चर सायकलवर सायकल चालवणे शिकलो.फरिद शेख.यांच्या इंग्लिश कोंबड्या संध्याकाळी डालक्यात झाकण्यासाठी जवळ आल्यावर त्या हुसकावून लावायचो..ध्येयवादी फरिद शेख यांनी आमच्या कडून बालवयातच नाटकंही करून घेतली..त्यात जयदिप,बापू हे ही सहभागी होते.गंगाधर धनगर, हे गोरख आप्पांच्या घराजवळ राहत होते...त्यांनी मला गायी चारत असताना विहिरीत बळजबरीने लोटून मला पोहणेही शिकवले.गारोडींच्या घोड्यावर रपेट मारता मारता..मी घोडा चालवणेही शिकलो.
अशा जवळच्या आठवणीतील मंडळीत मी लहानाचा मोठा झालो. पाचवी सहावीत असताना एकदा दुपारच्या सुट्टीमध्ये बेंच वाजवत गाणे म्हणत होतो.वरती आँफिस पर्यंत आवाज गेला.. गाणं म्हणत असताना ऑफिस मधून चौधरी सर आमच्या वर्गात एकदम आलेत. आणि त्यांनी जोरात ओरडून विचारलं सांगा गाणे कोण म्हणत होते..बेंच कोण वाजवत होते..मी भांबावलोच, ब्रह्मणशेवगाचा संतोष नावाचा मुलगा आणि मी गाणे म्हणत होतो. आम्हाला वाटलं आता आपली काही खैर नाही होती चौधरी सर जितके कॉमेडी होते तितके कडक शिस्तीचेही. मुलांनी आमचं नाव सांगितलं आणि आम्ही घाबरत घाबरत उभे राहिलोत. सरांनी काठी पुढे केली आणि हात पुढे करायला सांगितला.. आणि हातावर छडी द्यायच्या ऐवजी सरांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली... आणि उद्यापासून तुम्ही रोज सकाळी प्रार्थना म्हणायची अशी सुचना केली.रोज लवकर उपस्थित राहून आमच्या मागे सर्व विद्यार्थी प्रार्थना म्हणायची..
सर्वात्मका शिवसुंदरा...आजही ती पुर्ण तोंडपाठ आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात चौधरी सर यांनी आम्हाला नेहमीच विविध प्रकारच्या भूमिका साकारायला लावल्या...संजय बोरसे,डि.बी.सरांची सुनीता(मुन्नी) चौधरी सरांची मुलगी ज्योती..जयदिप, पुरूषोत्तम, बाप्पू चित्ते,आदींचाही सहभाग असायचा...
मैदानावर ही मैदान गाजवू लागलो..हाँलीबाँलमध्ये मी नेटकिपर म्हणून चांगले खेळायचो..क्रिकेट माझा आवडता खेळ.. वकृत्व स्पर्धेतही माझा नेहमीच मराठी भाषणात एक नंबर असायचा.. आमचा अमनदादा दादा नेहमीच मला चांगल्या प्रकारे भाषण लिहून द्यायचा माझ्याकडून तयारीही करून घ्यायचा..कोणत्या वाक्याला कोणती हालचाल, चेहऱ्यावर हावभाव कसे असावे... सर्व काही सांगायचे..
त्यालाही वाटायचं माझा लहान भाऊ माझ्यासारखा हुशार असायला हवा.. लंगडी खेळात मी नेहमी एकटा वर्गातील सर्व मुलींना बाद करूनच यायचो...
शालेय जीवनात आम्ही मित्र एकमेकांच्या घरी जेवायला जायचं पण जेव्हा माझ्या घरी जेवणाचा नंबर यायचा तेव्हा मला कमीपणा वाटायचं कारण मी जरी नोकरीवाल्याचा मुलगा असलो तरीही पाच बहिणी तीन भाऊ असा भला मोठा परिवार असल्यामुळे वडील सर्विसला असतानाही ही वडिलांच्या व्यसनामुळे माझ्या घरात काही वर्षे अठरा विश्व दारिद्र्य होतं हे सांगायला मी कदापि लाजणार नाही.. किंवा कमीपणाही घेणार नाही.बडा घर पोकळ वासा म्हणतात ना त्याप्रमाणे परिस्थिती होती. माझी आई शेतात राबून कष्ट करून पै.पै.आणायची तिलाही वाटायचं की माझ्या मुलांनी शिकून मोठं झालं पाहिजे ती नेहमीच माझ्या अभ्यासावर लक्ष ठेवून असायची. लहानपणी वडिलांना मी विरोध करायचो त्यांचा स्वभाव मला आवडत नसत त्यामुळे मी बंड करायचो आणि त्या बंडामुळे घरात मी एकटाच गुराढोरांसारखा मार खायचो वडीलांच्या भीतीपोटी मला वाचवायला कुणीही येत नसत.. असो ....
दहावी पास झाल्यानंतर नेमिनाथ जैन चांदवडला डेअरीसायन्सला गेल्यानंतर एक वर्षे जेमतेम काढले आणि नंतर घरी आलो. पैशांअभावी मला 11वी सायन्स अपूर्ण सोडावं लागलं.बारावीला परत गावात नवीनच बारावी झाली होती आणि बारावी नवीन वर्ष नवीन शैक्षणिक वर्षातच मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. आणि योगायोग सुधाकरराव नाईक यांच्या कृपेने बारावीनंतर डिएड सुरू झालं. 1993/94 मध्ये डीएड ला गेलो..
बारावी पास झाल्यानंतर मी डीएड करावं असं आमच्या अमन दादांनी ठरवलं. माझा नंबर कोसबाडहिल तालुका डहाणू जिल्हा ठाणे येथे डीएड ला नंबर लागला ॲडमिशन घेण्यासाठी तो भाग परिचित नसल्याने आपल्या गावातील सन्माननीय नथ्थू वाल्मिक चव्हाण सर हे तेव्हा तिथे जाँबकरुन गावी रिटर्न आलेले होते. अमन दादांनी नथ्थू चव्हाण यांच्याबरोबर मला डिएड ला अँडमिशन घेण्यासाठी पाठवलं.कोसबाडहिल हे अनुताई वाघ यांचे कार्यक्षेत्र त्यांनी केलेल्या कार्याचे दर्शन मला तिथे गेल्यानंतर समजले. त्या कार्यवर मी प्रभावित होऊन आपणही काहीतरी शैक्षणिक कार्य करावं हे मी तिथेच मनात पक्के गेले होते. जळगाव लाही डिऊडला शेवटच्या टप्प्यात नंबर लागला जळगाव रहाता येणार नाही या विचारात असताना परभणी व मालेगाव येथूनही ऍडमिशन बाबत विचारणा झाली. दादांनी कोसबाडला जाऊन तेथील ऍडमिशन रद्द करून मालेगावला माझं ऍडमिशन घेतलं आणि मला सांगितलं आता पाच दहा दिवसांनंतर तू कॉलेजला जायचं..
मालेगाव असतानाही मी तिथे प्रेस मध्ये पार्टटाइम काम करून डिएड पूर्ण केलं.दादा ही राष्ट्रीय विद्यालय मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनाही दोन वर्षे पगार नव्हता अशा परिस्थितीतही कसे,कोठून आजही माहिती नाही अमन दादाने मला दरमहा पाचशे रुपये पाठवून माझे डीएड पूर्ण केलं हे मी अभिमानाने सांगू इच्छितो.
ज्या मुलाचे वडील नोकरीला असूनही मुलांसाठी,मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करू शकत नाही हे आमचं दुर्दैव होतं. मोठ्या बहिणी..आई.. शेतात काम करून आपला प्रपंच चालवून दादासाठी थोडे खर्च करत होते अशा पध्दतीने अमनदादाचे डिएडचे शिक्षण पुर्ण केलं.दादाचे रुम पार्टनर प्रतापराव चव्हाण यांना याची जाणीव आहे.. त्यांनी ही अमन दादाला सांभाळून घेतले...
माझे डिएड पूर्ण झाल्यानंतर मलाही 96 मध्ये नोकरी लागली..
नोकरीची आँर्डर आली तेव्हा मी आपल्या गावातील सरकारी दवाखान्याचे बांधकाम सुरू असताना मजूरीने मिस्तरीच्या हाताखाली काम करत होतो.
पोस्टमन मधू आण्णा मला तिथे कामावर सांगायला आले...की तुला आँर्डर आली म्हणून... तो आनंद कायमच स्मरणात राहील...
राजापूर गावापासून तीन किलोमीटर लांब अंतरावर माझी शाळा होती *हवालदार वस्ती..* केंद्र राजापूर..शाळा कसली त्या पडक्या घरात माझी शाळा भरत होती आणि मी तिथे ज्ञानार्जन करत होतो.एकशिक्षकी शाळेत सर्व चार्ज माझ्या कडेच होता. आज माझी 5/6 विद्यार्थी शिक्षक आणि 9/10 विद्यार्थी देशसेवेत फौजी म्हणून देशाची सेवा करीत आहेत.
1996 मध्ये माझा पगार होता 3500 रुपये आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या घरच्यांना माझ्या परिवाराला एक रुपयाचाही चटका बसू दिला नाही, देत नाही, आणि देणारही नाही..
नोकरीत२/३ वर्षात संगतीचा परिणाम माझ्या वरही झाला..मी काही काळ बिघडलोही होतो.. आज अभिमानाने सांगू इच्छितो मी जरी काही काळ बिघडलो होतो तरीही माझ्या परिवाराकडे माझं दुर्लक्ष कधीच झालं नाही. कारण माझ्या आई आणि बहिणींनी केलेला त्याग मी कधीच विसरू शकत नव्हतो. त्यांनी आमच्यासाठी केलेले कष्ट, दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन आम्हाला घडवलं हे मी कसा विसरू शकेल.. *आईवडील ही जगातील इतकी मोठी हस्ती आहे ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुध्दा परतफेड कोणताच मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जन्मी करु शकत नाही...*
पाच मुलींपैकी फक्त एकाच मुलीचे लग्न वडिलांनी केलं,आणि उर्वरित चार बहिणींची लग्न आम्ही भावडांनी केलं...
मोठी बहिण सयाबाई ही आज पाचो-यात सहशिक्षिका आहे..दोन नंबर घरीच पण पाव्हुणे वकील व राजकारणात आहेत. तीध नंबरची बहिणही खुप हुशार होती..छाया..ती आज आशा वर्कर्स ची सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. चार नंबर औरंगाबाद ला पाच नंबर ची आमची सर्वांची लाडकी बंटी ती ही खुपच हुशार होती.. पैंशाअभावी तिचे शिक्षण अपूर्ण राहायला नको म्हणून एक प्लाँटही विकायला मागेपुढे पाहिले नाही.. आज ती इंग्रजीतुन बी.एड करून ब्राह्मण शेवगा येथे कार्यरत आहे. लहान भावाचे आयटीआय करून तोही औरंगाबाद येथे कंपनीत परमंनंट आहे..लहान भाऊ रवीचा एका अँक्सिडेन्ट मंध्ये पुर्नजन्म झाला.. माझ्या मिसेस मुळे आज माझा लहान भाऊ मला डोळ्यासमोर आज दिसत आहे.हे आवर्जून सांगावेसे वाटते.
बहिण भावडा़चे शिक्षणही आम्ही केले..स्वतःच्या पायावर उभे केले.. नव्हे ते आमचे कर्तव्यच आहे. असो..
1996 ते 2006 दहा वर्षात अनेक विद्यार्थी आलीत गेलीत काही आजही नोकरी करतात..२/३ विद्यार्थी राजकारणात आहेत..एक सरपंच झाला.. असो...
2006 ते 20010 खरवंडी तालुका येवला येथे बदलीने गेलो..तिथेही माझ्याकडे चार्ज आला. आवडीच्या विषयात म्हणजे सास्क्रुतीक कार्यक्रमात जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धेत माझ्या शाळेने वैयक्तीक व समुह गीतगायनामध्ये प्रथम क्रमांक चे पारितोषिके सलग 4 वर्षे पटकावलीत..तिथले 5/6 विद्यार्थी देशसेवा फौजी आहेत..
काही बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका आहेत.
2002 मध्ये खुलताबादला भद्रा मारुतीच्या 5 फे-या पुर्ण केल्यात,योगायोगाने भद्रा मारुती येथील एकुलती एक मुलगी,ती ही डिएड झाले ली.नोकरीला लागलेल्या मुलीशी विवाह जमला.पहिले बाळ मुलगाच झाला.ही भद्रा मारुतीचीच क्रुपा...
जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या जातेगाव बोलठाण येथे मी 2010 ला बदली करुन घेतली.. कारण मला शिरसगावहुन अपडाऊन करणे सोपे होते म्हणून.पाहिजे तशी शाळा नव्हती..तिथेही मला मु.अ.ची जबाबदारी आलीच..पण मी कामाला घाबरणारा नव्हतोच मुळी.. *जनार्दन स्वामींच्या कृपेने माझ्यातला वाल्याचा वाल्मिकी जागा झाला* त्यासाठी माझ्या मिसेसनेही 10 वर्षी माझ्यात बदल घडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला.. आणि तिच्याच सहकार्यने तिच्या प्रयत्नांना यश आले.2010 पासून माझ्या जिवनाला एक टर्निंग पाँईन्ट मिळाला..जातेगाव बोलठाण पासूनच मी तंत्र शिक्षणावर जोर दिला 2011/12 मध्ये आम्ही सर्व तंत्रस्नेही शिक्षकांनी गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये एक भव्यदिव्य असे शैक्षणिक तंत्रज्ञान संमेलन आयोजित केले. 2016 मध्ये खुलताबाद येथे ज्ञानरचनावादी संमेलन आयोजित करून महाराष्ट्रभरातील जवळपास सहा हजार शिक्षकांना तंत्रज्ञान शिकवलं याच काळात मानव संशोधन मंत्रालयाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कारही प्राप्त झाला. सेवाभावी संस्थांकडूनही 5/6 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
एक मुलगा असुन तो 12 वी ला असून JEE ची औरंगाबादला तयारी करतोय..
2017 मध्ये आंतरजिल्हा बदलीने फुकटात औरंगाबाद जिल्ह्यात बदली करून घेतली. कन्नड तालुक्यातील कन्नड शहरातील कन्नड याच शहरात कन्नड नंबर1 या शाळेत रुजू झालो..एक वर्षे सुखात गेले 2018 ला परत मु.अ.ची जबाबदारी पार पाडावी लागली ती आजपर्यंत...
महाराष्ट्र अँडमीन पँनल नंतर आज आम्ही आमच्या संपूर्ण टीम मिळून *महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP* या नावाने महाराष्ट्रभरातून जवळपास 165 शैक्षणिक ग्रुप द्वारे महाराष्ट्रभरातील शिक्षकांना पर्यायाने विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचे एक पवित्र कार्य हाती घेतलेले आहे.महाराष्ट्र शिक्षक पँनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्र भरातून प्रत्येक तालुक्यातील शिक्षक वर्गाच्या मोबाईल फोन मध्ये माझा फोन नंबर सेव्ह असल्याचे भाग्य मला लाभले हे काही कमी नाहीच..पँनलच्या माध्यमातून मागच्या वर्षी औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहात तीन आमदारांच्या उपस्थितीत महाराष्ट्रभरातील दऱ्याखोऱ्यातील आपले आदर्श शिक्षक आहेत जे उत्कृष्ट काम करत आहेत.ज्यांना आजपर्यंत शासनाने सन्मानित केले नाही असे जे आदर्श शिक्षक आहेत जे खरोखरच प्रेरणादायी असे कार्य करत असतात अशा शिक्षकांना सर्व महाराष्ट्र भरातून प्रत्येक जिल्ह्यातून एक या प्रमाणे शिक्षक आमदार यांच्या हस्ते *सेवा सन्मान पुरस्कार* देऊन,प्रमाणपत्र,शाल स्ट्राफी देऊन त्यांचा गौरव घडवून आणला..हे खुप पुण्याचे कार्य माझ्या व आमच्या टिमला करावयास लाभले. या कामात मला माझे मित्र जयदिप चव्हाण सरांनी ही खूप मोलाची मदत केली.एक महीने रात्रभर राबून आम्ही त्या सोळळ्याची तयारी केली. आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्दिष्टाने मी गेल्या 7/8 वर्षापासून खुलताबाद येथील जायंट्स ग्रुप आँफ खुलताबाद या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत कार्य करीत आलो आहे.कोरोनाच्या काळात गरजवंतांना खायला जेवणाचे डबे..कपडे.औषधी, मेडिकल, पिण्याचे पाणी, मास्क, सँनेटायझर,स्वखर्चाने, पोलीस, नर्स,व गरिबांना वाटप केले. या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली.आज मी जाँयट्स ग्रुप आँफ खुलताबाद चा सचिव या पदावर कार्यरत आहे. खुलताबाद येथील मराठी वाचनालयाचे सचिव म्हणूनही काम पाहत आहे.1996 पासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मध्ये सक्रिय असून गेल्या सहा वर्षापासून शिक्षक समितीचा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही संघटनात्मक कार्य करीत आहे.नाशिक जिल्ह्यातही शिक्षक समितीने माझी जिल्हा प्रसिध्दीप्रमुख म्हणून निवड केली व आज रोजी औरंगाबाद जिल्ह्यात बदली करून फक्त 3 वर्षे झालीत..तरीही गेल्या 2 वर्षापासून औरंगाबाद मध्येही माझे काम पाहून शिक्षक समितीने जिल्हा प्रसिध्दीप्रमुख म्हणून निवड केली आहे...आणि त्या संधीचे सोने करून आपल्या शिक्षकांच्या अन्यायाला..शिक्षकांच्या प्रश्नावर समितीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील अंसतो....मला याकामी माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद व माझ्या मिसेसचे सहकार्य लाभले म्हणून च मी हे सर्व करु शकतो यात तिळमात्र शंका नाही.
मी आपल्या पुढे वयाने,उंचीने लहान जरी असलो तरी एक लहान तोंडी मोठा घास घेतोय ,आपणा सर्व गुरुजनांना एकच विनंती करु इच्छितो...
तो म्हणजे,आपल्याला संविधानाने जसे हक्क मिळवून दिले आहेत.. तसे आपलेही समाजाप्रती,गावाप्रती काही कर्तव्य देखील आपण पार पाडलीत तर आपल्या गुरु या पदाची अजूनही उंची उंचावल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की...
मित्रांनो खुप सा-या आठवणी आहेत. पण काही लक्षात असलेल्या आठवणी शेअर केल्यात,जे मला योग्य वाटले ते लिहीले...चुकून काही लिहिले गेले असेल तर क्षमस्व..
आपलाच बंधूवत ...
सतीश कोळी🙏

1 Comments
खूप,खूप अप्रतिम ,भावस्पर्शी मनोगत सर.
ReplyDelete