माझी यशोगाथा-रवींद्र चव्हाण शिरसगाव


🙏माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग.🙏
12 ऑगस्ट 1991 रोजी मी जि.प.मधे जामनेर तालुक्यात सोनारी या गावी शिक्षक म्हणून रूजू झालो.त्या दीवशी मला खूपच आनंद झाला.12 ऑगस्ट 1991 पासून ते 5 डिसेंबर 1995 पर्यंत मी जामनेर तालुक्यात मनापासून सेवा केली. 5 डिसेंबर 1995 रोजी माझी बदली आपल्याच गावी शिरसगांव येथे झाली याही वेळी खूप आनंद झाला.आपण ज्या शाळेत शिकून मोठे झालोत त्याच शाळेत आपल्याला सेवा करायला मिळल्यामुळे मनाला खूप समाधान वाटले. माझे वय 28 असतांना माझी बदली गावी झाली.स्टाफ मधे मी एकटाच तरुण शिक्षक होतो.विद्यार्थ्यांना खूप मनापासून शिकविले.त्यावेळचे बरेच विद्यार्थी आज चांगल्या पदावर काम करीत आहेत.उदा द्यायचे झाले तर आज पी एस आय. असलेले कल्पेश विजय चव्हाण. बाळासाहेब भिकन चव्हाण.सुनील अर्जुन चव्हाण .तिलक भिमराव पाटील.राहुल युवराज चव्हाण.हे माझे विद्यार्थी खूपच आज्ञाधारक व हुशार होते.शिरसगांव शाळेत 6 डिसेंबर 1995 ते 14 जून 2011 पर्यंत मी सेवा केली. या पंधरा वर्षाच्या काळात मी पंधरा दिवस सुद्धा अर्जित रजा काढलेली नाही.15 जून 2011 रोजी माझी बदली माळशेवगे येथे झाली.तेथे मी18 मे 2018 पर्यंत सेवा केली.तेथून बदली होवून 19 मे 2018 पासून मी तळोंदे दिगर येथे प्र.मुख्याध्यापक म्हणून सेवा करीत आहे.🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments