माझी यशोगाथा-जयदीप जयवंतराव चव्हाण कार्यस्थळ-- देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद


*नाव* - -जयदीप जयवंतराव चव्हाण
*कार्यस्थळ*-- देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद *शिक्षण*-- M.Sc.(Physics) M.Ed.                                      *               🥀 *माझा प्रवास*🥀                               माझे प्राथमिक शिक्षण आपल्या सर्वांची आवडती मराठी शाळा .. प्राथमिक विद्यामंदिर शिरसगाव येथे झाले... आम्हाला शिकवायला आदरणीय राघो गुरुजी होते...राघो गुरुजी म्हणजे अत्यंत कड़क शिस्तिचे... त्यांच्यमुळे आमचा गणिताचा पाया प्राथमिक शाळेतच पक्का झाला...तसेच शिस्तही लागली...मला सकाळी लवकर उठायचा फार कंटाळा त्यामुळे मला प्रार्थना काही सापडायची नाही...मग गुरुजिंनी आबांना बोलावून घेतले त्यांच्यासमोरच चांगला प्रसाद दिला...त्यानंतर मात्र कधी उशीर नाही झाला....मग अभ्यासात सुद्धा चांगली प्रगती झाली...जसा शिक्षणाचा पाया प्राथमिक शाळेत पक़्क़ा झाला तसाच मैत्रीचा पाया सुद्धा इथेच पक्का झाला कारण प्राथमिक शाळेत मला बापुराव चित्ते, किशोर चव्हाण, दीपक चव्हाण, RK, प्रमोद ,निम्बा चव्हाण, निम्बा पाटील, चंद्रकांत वाडेकर ,राजू वाघ असे चांगले मित्र मिळाले ...सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत ती दोस्ती टिकून आहे...आम्ही अभ्यासात जसे हुशार होतो तसे खोडकर आणि खेळकर होतो..मला आठवते मधल्या सुट्टीत आम्ही शाळेच्या बाजूला बाबूलाल धनगर यांचा गोठा होता तिथे खेलायचो कारण त्यांचा भाचा भिकन आमचा चांगला मित्र...असो प्राथमिक शिक्षण मजेत झाले चांगले मार्क मिळाले ..पुढे न्यू इंग्लिश स्कूल शिरसगाव मधे माध्यमिक शिक्षण सुरु झाले.... हायस्कूल मधे आदरणीय बी.बी.दादा, जी.एस. बापू, शहा सर,आमचे आबासाहेब, ड़ी. बी.सर,चौधरी सर,जिभाऊ सर,आर.डी. बोरसे सर,एस.एस. पाटील सर,वाय. एम.पाटील सर, गोरख आप्पा, आर.एस. अहिरे सर,पवार सर आदी गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले....हायस्कूल मधे शिक्षणासोबतच वकृत्व स्पर्धा....कथाकथन... चित्रकला ...तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यातही मी तेव्हढयाच तन्मयतेने सहभागी होत होतो...15 ऑगस्ट ..26 जानेवारी ला शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यात आमची नाटिका असायची... त्यात महत्वाचा रोल माझ्याच वाटयाला...आदरणीय चौधरी सर दररोज शाळा सुटल्यावर आमची रिहसल घ्यायचे प्रत्येक पात्रात जीव ओतुन अभिनय कसा करायचा हे त्यांच्यमुळेच आम्हाला जमले....सानेगुरुजी कथामालेसाठी सतीश..बापू...दीपक..असे अजुन काही मित्र आम्ही चाळीसगावला पण 2-2 दिवस जायचो तिथे यदुनाथ थत्ते यांच्या सारखे बऱ्याच मान्यवरांचे विचार ऐकायला मिळाले ....तसेच "श्यामची आई" या पुस्तकातिल साने गुरुजिंचे अनुभव त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांनी "रात्री" या सदरात मांडले ...ते वाचून अंगावर शहारा यायचा...आणि ते अनुभव प्रार्थना झाल्यावर वडाच्या झाडाखाली सहअभिनय सर्वांसमोर मांडताना एक वेगळीच अनुभूति मिळायची....याच वडाच्या झाडाखाली महात्मा गांधीजी.. लोकमान्य टिळक यासारख्या महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथि निमित्त वक़्तृत्व स्पर्धा होत असत त्यात सहभागी होऊन बऱ्याचदा प्रथम पारितोषिक मिळवले आणि या स्पर्धामुळे स्टेज डेयरिंग आली त्याचा फायदा आज देखील होतोय.....त्यामुळे या कल्पवृक्षाविषयी नितांत आदर आहे...हायस्कूल मधे आदरणीय एस. एस. पाटील सरांमुळे गणित विषयात प्रावीण्य मिळवले त्याचा आजही फायदा होतोय...आदरणीय आर.डी. बोरसे सर विज्ञान शिकवायचे ..बऱ्याच व्याख्या ते English मधे पण लिहून देत... त्यामुळे Science चा base भक्कम झाला...आदरणीय शहा सर...आमचे आबासाहेब ...वाय.एम.पाटील सर यांच्यामुळे इंग्रजी वर पण चांगले प्रभुत्व मिळवले.... मला आठवते आम्ही सातवीत असताना आबासाहेब इंग्रजी शिकवायचे ...दोधा बापुजींच्या घराच्या बाजूला सुरुवातीला आमचा वर्ग होता...आबांनी इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करण्यासाठी group केले होते आणि प्रत्येक group चा एक प्रमुख होता...त्या प्रमुखाने आपल्या group कडून शब्दार्थ पाठ करून घ्यायचे व स्वतःहि पाठ करायचे....माझ्या group चा नम्बर आला...मि पाठ केलेले सांगितले पण group मधील 1-2 जणांना काही शब्दार्थ सांगता आले नाही....त्यामुळे प्रथम मला चांगला चोप बसला...कारन मि प्रमुख होतो ...माझी जबाबदारी मि नीट पार पाडली नाही....पण त्यातून मि शिकलो की नुसते प्रमुख होऊन चालत नाही तर group ची काळजी पण घ्यावी लागते......वाय. एम.पाटील सरांनी शिकवलेले grammar आजही लक्षात आहे...अशा प्रकारे सर्वच आदरणीय गुरुजनांमुळे शिक्षणात बहुमूल्य मार्गदर्शन मला मिळाले...प्रत्येक वर्गात चांगले मार्क मिळाले ...प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होतो....त्याच बरोबर आमच्या मैत्रिची वीण दिवसेंदिवस घट्ट होत होती....मधल्या सुट्टीत आमचे ठरलेल राहयच आज बापुकडे... कधी किशोर कड़े...कधी निम्बाकड़े..कधी माझ्याकडे....तर कधी राजुकडे जेवण... मस्त लोनचे भाकरी ...चटनी भाकरी ...जे असेल ते आंनदाने खायचो....कधी कधी रविवारी अभ्यास झाल्यावर आम्ही चोर पोलिस खेळत खेळत पींप्री... ब्राह्मणशेवगे इथपर्यंत पोहचायचो मग तिथल्या मित्रांकडे कधी कधी जेवण पण करून यायचो.....कधी बोर वेचायला निम्बाच्या शेतात जायचो....पुढे फरीददादाने आमच्यातला कलाकार जीवंत ठेवला...फरीददादा विविध ज्वलंत विषयावर नाटक लिहायचे त्यांच्या बरोबर गरुड़ सर, संजू आबा,आमचे प्रदीपदादा,सन्दीपदादा,राजू गायकवाड़ ,पांडुरंग बापू,गंभीरदादा अजुन काही वरिष्ठ मंडळी होते त्यांनी आधी काही नाटक बसवले... सादर केले.. मग आमची ज्युनिअर टीम मि,बापू,सतीश,दीपक,किशोर,चंद्रकांत वाडेकर,प्रमोद ,राजु या सर्वांना घेऊन विविध नाटक बसवली ...गणेश उत्सवात आम्ही बाहेरगावी जाऊंन पण नाटक सादर केली....नाटकाचा सराव करताना गरुड़ सर, राजू गायकवाड़  यांचेही  आम्हाला छान मार्गदर्शन मिळाले...आणि सर्वांशि चांगले ऋणानुबंध प्रस्थापित झाले...ते आजपर्यंत टिकून आहेत याचा मला विशेष आनंद वाटतो....मि आधीच सांगितले अभ्यासा बरोबरच अंगात थोड़ा खोडकर...खेळकरपणा होता...10 वी ला असतानाचा एक प्रसंग आजही लक्षात आहे ....तेव्हा 10वी च्या वर्गातील मुलांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यासाठी चाळीसगावहुन तज्ञ मार्गदर्शक शिक्षक यायचे...साधारण आठवड़ाभर तो program राहयचा ...तो program सुरु असताना एकदा आम्ही ब्राह्मणशेवगे येथे यात्रा असल्यामुळे गेलो होतो कारण आमचे काही मित्र राजू...निम्बा...राजू वाघ यांना कुस्तीची आवड़ होती ...बर आम्ही तर गेलो आमच्या नन्तर  सर्व वर्गातले मूल घरी निघुन गेले...बाहेरगाव हुन मार्गदर्शनसाठी शिक्षक आलेले....ही गोष्ट बी.बी.दादा ,आबा यांच्या कानावर गेली ...मग काय दुसऱ्या दिवशी दादा, आबा वर्गात आले...विचारु नका खुप मार बसला.....तेव्हा कळले की नुसती *हुशारी* काही कामाची नाही त्यासोबत *जबाबदारी* चे पण भान आवश्यक आहे...मग मात्र आम्ही चांगले अभ्यासाला लागलो.....आम्हाला अभ्यासासाठी रात्री शाळेत staff room दिली....गुरुजनांचे आमच्यावर लक्ष होते..... हायस्कूल मधे असताना विविध स्पर्धा परिक्षेविषयी संदीप दादा,हिलाल दादा यांचे पण मार्गदर्शन मिळाले...त्यांच्यकड़ून प्रेरणा मिळाली...10 वी ची परीक्षा बेलगंगा येथे पार पडली ...परीक्षेत चांगल्या गुणांनी विशेष प्रावीन्याने उतीर्ण झालो...मग पुढे सर्वजन वेगवेगळ्या ठिकाणी विशिष्ट ध्येयाने शिक्षणासाठी शिरसगाव सोडून बाहेर पडलो...त्यावेळेस खुप रडलो... कारण गाव...मित्र यांना सोडून लांब जाणार होतो ...पण ध्येयही महत्वाचे होते....मि प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे Science ला प्रवेश घेतला....बापू...किशोर...संजय बोरसे..यांनी डी. एड. ला प्रवेश घेतला...बाकीचे आमचे मित्र राजू, निम्बा ,रमेश, चंद्रकांत यांनी गावातच 11वी कला शाखेत प्रवेश घेतला...स्वप्न मोठी होती पण माझे दुर्दैव मला 12 वी science ला असताना कावीळ झाला... त्यामुळे 5-6 महीने अभ्यासावर पाणी फेरले गेले....परिणामी 12 वी ला score नाही करता आला कारण तेव्हा CET नव्हती ...बोर्डच्या मेरिट वर इंजीनियरिंग व मेडिकल ला प्रवेश मिळायचा...थोड़ा नाराज झालो...पण आई वडील ,भाऊ व मित्रांनी समजूत काढली ...मग मि चाळीसगावाला धुळे रोडच्या कॉलेजला B.Sc.ला प्रवेश घेतला...शिरसगावहुन updown सुरु झाले....B.Sc.ला Physics...Maths.. Electronics विषय घेतले...पुढचा प्रवास सुरु झाला...B.Sc. final year ला माझा आवडता  Physics  विषय घेतला ....आणि  चांगल्या मार्काने  B.Sc. ला first आलो....या दरम्यान माझे जीवलग मित्र बापू, किशोर हे शिक्षक म्हणून नोकरिला लागले...राजू, निम्बा, हे सैन्यात भरती झाले...पण त्यांनी मला कधीही जाणवू दिले नाही...मला सतत प्रोत्साहन दिले "तू भरपूर शिक...तुझ्या मधे potential आहे काहीतरी वेगळे करून दाखव" तसेच माझे मोठे बंधु संदीपदादा यांचेही मार्गदर्शन मिळत होते....त्या दरम्यान प्रदीपदादा पण कृषी विभागात नोकरिला लागले....त्यांचे मला भक्कम पाठबळ मिळाले...माझ्या या प्रवासात "क्रिकेट " हा जीवनातील अविभाज्य घटक...सुरुवातीला फकीरा सर, अमनदादा ,राजूदादा (गायकवाड़ ), सन्दीपदादा, रोहिदास अहिरे, हे क्रिकेट खेळायचे मग त्यांच्यासोबत सतीश ,मि, पुरुषोत्तम खेळत होतो....नन्तर आम्ही सतीश, दशरथ ,पुरुषोत्तम,मि,योगेश वाडेकर ,गणेश,प्रकाश,जीभू,लोधर, बापू, मिळून नवीन टीम केली... रविवारी हमखास मैच असायची...नन्तर सतीश ,बापू,किशोर नोकरिनिमित बाहेर गावी गेले.... मग पुन्हा कॉलेजला असताना "अक्षय क्रिकेट क्लब" ची स्थापना झाली...त्यात वरील मंडळी होतीच पुन्हा शिरीष , नवल,भोला,शशिकांत, असे अनेकजन सहभागी झाले...टीमचे नेतृत्व माझ्याकडे...दररोज संध्याकाळी शाळेच्या मैदानावर सराव करायचो आमची प्रतिस्पर्धी टीम लडडूबाबाची होती...एकदम भारत-पाकिस्तान सारखी match व्हायची ...त्यामुळे दोघ टीम एकदम जीव तोडून खेलायचो.... त्याचा परिणाम म्हणजे दोघ टीम एकदम perfect झाल्या....मग काय आजुबाजुच्या गावाला कुठेही tournament असली तिथे आम्ही सहभागी व्हायचो....बरीच बक्षीस मिळवले...क्रिकेटमुळे बऱ्याचदा घरी मार पण खाल्ला ...पणअभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष होउ दिल नाही....B.Sc. चांगले marks मिळाल्यामुळे M. Sc.(physics) merritने पुन्हा प्रताप कॉलेज ला नम्बर लागला......प्रताप कॉलेजचा परिसर म्हणजे साने गुरुजिंची कर्मभूमि...शिक्षणाचे माहेरघर...M.Sc.ला 2 वर्ष खुप अभ्यास केला कारण आमचा Physics विषय म्हणजे खुप अवघड़... M.Sc. लाही Distinction ने उत्तीर्ण झालो...पुढे B.Ed.  धुल्याजवळ नगाव ला नम्बर लागला.....B.Ed.ला खुप शिकायला मिळाले....तिथेही चांगले मार्क मिळत होते.....B.Ed.असताना "आदर्श विद्यार्थी- शिक्षक " पुरस्कार मिळाला...मग आत्मविश्वास वाढला की आपण शिकवू शकतो.....B.Ed. सुद्धा Distinction मिळवून कॉलेजला प्रथम आलो...तिथुन पुढे खरा संघर्ष सुरु झाला....B.Ed.झाल्यानंतर  आबासाहेब व नथाबापुजी यांची भेट झाली .....आर्वीला नथाबापुजी यांच्या संस्थेत नवीनच 11वी 12वी Science ला मान्यता मिळाली ...मग मि बापूजीच्या मदतीने तिथे join झालो...नवीनच कॉलेज सुरु झाले त्यामुळे शून्यापासुन सुरुवात....तिथे मि Physics व Maths शिकवायला लागलो ....बापूजींच्या staff च्या सर्वानी मला खुप सहकार्य केले... Confidence दिला....पण पुढे दुर्दैवाने संस्थेत वाद सुरु झाले...व कॉलेजच भवितव्य काही चांगल दिसत नव्हते मग मि तिथुन बाहेर पडलो.....नन्तर राष्ट्रीय विद्यालय संस्थेत 3 महीने अंधारी हायस्कूल ला Leave vacancy वर काम केले.... त्यामुळे तिथेही बराच अनुभव आला......पुढे आमची ताई व पाहुणे औरंगाबादला असल्यामुळे त्यांनी मला  तिकडे बोलावून घेतले....पाहुणे सिनिअर कॉलेजला प्राध्यापक ...त्यांच्या ओळखिमुळे मि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या "मिलिंद विज्ञान महाविद्यालय " येथे तासिका तत्वावर रुजू झालो कारण तिथे O.B.C.ची जागा होती ...तासिका तत्वावर जास्त मानधन मिळत नव्हते म्हणून मग त्यासोबत छावणी परिसरातील एका खासगी क्लासवर tution घ्यायला सुरुवात केली....माझ्यासोबत अजुन Biology... Chemistry चे 1-2 सहकारी देखील होते....आमचा group चांगला जमला होता tution ला मूल वाढत होती ..पण class वाला त्या तुलनेत चांगल मानधन देत नव्हता...मग कॉलेज मधल्या आमच्या वरिष्ठ सहकारी कदम सर ,डेंगले सर यांनी आमची मेहनत बघितली व म्हटले की तुम्हीच class का सुरु करत नाही....आम्ही म्हटल एव्हढा मोठा hall कुठे मिळेल त्याचे भाड़े खुप असणार... मग त्यांनीच आम्हाला hall मिळवून दिला....अशा प्रकारे स्वतःचा Bright Coaching Classes नावाचा क्लास 3 जनांनी मिलिंद कॉलेज च्या समोर  सुरु केला...त्यातही बऱ्याच अडचणी आल्या.....बरेच जन म्हणायचे इथे class चालणार नाही..लोक पैसे देणार नाही...पण आम्ही हिम्मत हारलो नाही ...10 मुलांवर class सुरु केला...हळूहळू मुले वाढू लागली...50 च्या वर सँख्या गेली... दिवसरात्र मेहनत करून चांगल्या notes बनवल्या.....गरिब मुलांकडून त्याची condition बघून fees घेतली ....ज्यांना ते पण शक्य नव्हते त्यांना class ची छोटी मोठी काम दिली कारण फुकट काही दिल तर त्याची किम्मत राहत नाही....अस सर्व सुरु होत...अशात मिलिंद कॉलेजची नोकर भरतीची जाहिरात आली ...पण त्यात माझी post ....S.B.C व N.T. ला सुटली होती....आधी  O.B.C.ला post होती.... खुप वाईट वाटले...एक आशा होती तीही सम्पली....माझ्या बाबतीत "*आयुष्याने वेळोवेळी असेच चकवले होते ..जेव्हा उत्तर सापडले तेव्हा प्रश्नच बदलले होते*" अस घडत होते....पण जिद्द सोडली नाही कारण आई वडिलांचे आशीर्वाद व गुरुजनांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी सोबत असल्यामुळे असे कितीही प्रश्न उभे ठाकले तरी त्याची उत्तर शोधून मार्ग काढ़ायचा ...अस सुरु होते....त्या दरम्यान मि" विवेकानंद महाविद्यालय " ला पण तासिका तत्वावर B.Sc. चे तास घ्यायला लागलो....मि ताईकड़े राहत होतो...पण 2 कॉलेज ....Tution यामुळे खुप धावपळ होत होती ...मग ताईशी बोललो व समर्थ नगरला  2-3 जन रूम करून राहू लागलो..आता मनाशी  खुणगाठ बांधली.. नोकरीच काही होवो ....Tution मधे जीवतोडून मेहनत करायची ...आणि औरंगाबाद मधे tution field मधे Physics या विषयात जी नाव घेतली जातात त्यात *जयदीप चव्हाण* हे नाव आले पाहिजे....सकाळी tution के 2-3 तास....दुपारी 2 college ला जाउंन period , practical घेणे ....संध्याकाळी पुन्हा tution....दुपारच जेवण जसा वेळ मिळेल तस करायचे ...कधी कधी नाष्टयावर भागवुन घ्यायचे.....कधी पायी ..कधी रिक्षाने प्रवास.....Tution ला मूल वाढत होती 70-80 पर्यंत आकड़ा पोहचला ...त्यात काही गरीब विद्यार्थ्यांना fees मधे थोड़ी सूट देत होतो....एक प्रकाश राठोड नावाचा मुलगा होता ..त्याच्या घरची परिस्थिति खुपच बिकट होती ...आई वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचे...त्याने सर्व कहानि सांगितली ...मग त्याला free मधे admission दिले ...पुन्हा त्याचा राहयचा प्रश्न होता...त्याला class ची store room होती ...तिथे सामान टाकायला लावले....आणि class ची सफाई....Xerox करणे....अशी छोटीमोठी काम दिली....तो अभ्यासात हुशार होता....Maths चांगल होत...शरीर प्रकृति धड़धाकट ...मग मि त्याला Air force ची तयारी करायला सांगितली....Entrance साठी काहि पुस्तक घेऊन दिली.... English विषयावर पण focus करायला सांगितले....त्यानेही मन लावून अभ्यास केला...12वी ला चांगले मार्क मिळाले आणि पहिल्या प्रयत्नात Airforce ची entrance पास झाला....आज तो अधिकारी पदावर काम करतोय....असो अस सर्व सुरळीत सुरु असताना October 2003 मधे अचानक एक दुखद घटना घडली....माझे वडील.. माझे श्रद्धास्थान आबांची अचानक तब्बेत बिघड़ली ..चालीसगांव ला उपचार केले पण काही निदान झाले नाही....मग औरंगाबादला आणले...हेडगेवार हॉस्पिटल मधे admit केले ...सर्व test केल्या त्यात निदान झाले  लहान आतड़ी ला गैंगरीन झाला....लगेच operation चा निर्णय घेतला.....बहिन -पाहुणे ...मि माझे बंधु...सगळे होतो.... Operation बराचवेळ चालले ...सर्व व्यवस्थित झाले....पण लहान आतडे बरेच damage असल्यामुळे डॉक्टर म्हटले liquid food द्यावे लागेल....सर्व सुरु झाले ...पण दिवसेंदिवस प्रकृति खालावत गेली ....आणि जानेवारी 2004 मधे आबा आम्हाला सोडून गेले😢😢😢😢.....हा आमच्या कुटुंबावर फार मोठा आघात होता....मि तर पार कोसळलो😢 कारण माझ सगळ बाकी होत....2-3 महिने पूर्ण disturb होतो....पण त्या काळात माझे जीवलग मित्र बापू,किशोर, राजू,औरंगाबाद चे मित्र भोसले सर, किरवले सर यांनी खुप धीर दिला.....माझे मोठे भाऊ संदीपदादा ,प्रदीपदादा ,यांनी मला खूप आधार दिला......बहिन व पाहुणे यांनी तर मुलासरखा जीव लावला...आई फार रडायची भाऊ कस होईल म्हणायची ...तिला आम्ही सर्वांनी धीर दिला.....फार मोठा आघात होता....हळूहळू दुःख सावरत होतो.....पुन्हा माझ routine सुरु झाले.....मग मि मिलिंद कॉलेज सोडले......पाहुणे देवगिरी कॉलेजला होते त्यांच्या ओळखिने त्याच संस्थेचे शिवछत्रपती कॉलेजला join केले कारण संस्था मोठी असल्यामुळे पूर्ण मराठवाडयात विस्तार होता...पुढे जागा नीघाल्यावर काम करता येईल अस पाहुणे म्हटले......अशा प्रकारे आता विवेकानंद कॉलेज व शिवछत्रपती कॉलेज आणि tution याठिकानी प्रामाणिकपणे अध्यापनाचे  काम सुरु होते.....त्या दरम्यान विवेकानंद कॉलेज मधे जागा भरण्यासाठी जाहिरात निघणार अस माहित पडले मग संस्था चालकांना एका मध्यस्थि च्या माध्यमातू भेटलो त्यांच्याशी चर्चा झाली donation च बोलन झाल ते म्हटले अजुन वेळ आहे पण काम करू....जरा बर वाटल कुठतरी आशेचा किरण दिसला ....ताई व पाहुणे यांच्या बरोबर चर्चा  केली....थोड़ा उत्साह वाढला.......हे सर्व सुरु असताना लग्नाविषयी घरात चर्चा  सुरु झाली ...मूली बघायचा कार्यक्रम सुरु झाला.....आणि एक स्थळ निश्चित केल.....अशातच देवगिरि कॉलेजच्या संस्थेची पेपरला जाहिरात आली.... Application form भरला.....इकडे माझ्या engagement चा कार्यक्रम झाला...नंतर देवगीरी कॉलेजचे interview चे letter आले....  Interview ला भरपूर candidate होते.....पण माझा interview छान झाला ....ताई व.पाहुणे म्हटले बघू काही होत का......कारण त्यांची ओळख होतीच आणि मि संस्थेच्या शिवछत्रपती कॉलेज मधे काम करत होतोच ....पाहुणे संस्थाचालकांना भेटले.....ते बघू म्हटले....इकड़े लग्नाची तयारी जोरात सुरु झाली ..सोने खरेदी व बस्ता जळगावला करायचे ठरले....ठरलेल्या दिवशी जळगाव आम्ही गेलो मुलिकडचेही आले ....बस्ता सुरु असताना आनंदाची बातमी आली ताई व पाहुणे यांचा फ़ोन आला.......अभिनंदन म्हणे तुझ देवगीरी कॉलेजला selection झाले...एका क्षणात सर्व बदलल... सगळेजन  एकदम खुश.....मला तर सूचतच नव्हतं ...खुप आनंद झाला....होणारी बायको पण आलेली होती बसत्यासाठी....सर्व म्हणायला लागले बायकोचा पायगुन .....असो मग मि ताबड़तोब पैशानची जमवाजमव करून औरंगाबादला रवाना झालो......सर्व प्रक्रिया पडली....मग हातात order मिळाली....मि गप्पकन खाली बसून रडलो....कारण मि अड़थल्याची शर्यत पार केली आणि खऱ्या अर्थाने *जय* मिळवला होता......😢..नंतर मि संस्थेतुन order घेऊन college ला joining साठी गेलो.......आवारात पाय ठेवल्यावर थोड़ tension आल...भव्यदिव्य कॉलेज.... पण आनंद गगनात मावत नव्हता कारण महाराष्ट्रातील एका नामांकित कॉलेजमधे मला नोकरी मिळाली होती......Join झालो .....नन्तर 15 July ला लग्न झाले......मग संसार सुरु झाला.......माझी धर्मपत्नी M.A.(English) झालेली ....नन्तर लगेच B.Ed. करुन घेतले....Tution चा अनुभव असल्यामुळे Teaching उत्तम होत होते.......अल्पावधितच विद्यार्थीप्रिय झालो.....पण हे सुरु असताना मागचे दिवस विसरलो नाही.....वडिलांकडून मिळालेल समाजसेवेचे व्रत सोडले नाही......गरीब विद्यार्थ्यांना काही मद्त करता आली तर करत असतो........इथेपण चांगला मित्रपरिवार मिळाला......आमचा 8-10 मित्रांचा group आहे......
आम्ही दरवर्षी मान्यवरांचे 2-3 वाढदिवस *अनाथआश्रमात*  त्या मुलांना आवश्यक असलेले गरजू साहित्य देऊन साजरा करतो.....कारण."*मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना| त्या अनाथांच्या उशीला दिप लावू झोपतांना|कोणती न जात त्यांची कोणता न धर्म त्यांना|दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना|*" हे लक्षात होते.......या व्यतिरिक्त आमच्या कॉलेज मधे अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रम होत असतात त्यात विविध समिति प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाड़ली .....असो अशाप्रकारे माझी वाटचाल सुरु असताना घर घेतले...चारचाकी गाड़ी घेतली.......या पुढच्या प्रवासात माझी अर्धांगिनी गायित्री ची भक्कम साथ मिळाली.....माझी मुलगी जिगीशा  C.B.S.E.ला 9th class ला आहे......मुलगा राजवीर 5th ला आहे.....या माझ्या प्रवासात आई वडिलांचा आशीर्वाद.....गुरुजनांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी .....भावांचे भक्कम पाठबळ.........जीवलग मित्रांनी दिलेला आधार आणि सर्वात महत्वाचे माझे श्रद्धास्थान माझी ताई व आदरणीय पाहुणे यांचे मोलाचे योगदान आहे...........शेवटी आपल्या group विषयी....रवि सर ,भगवान गरूड़ सर, प्रिय मित्र सतीश यांनी Teacher's Group स्थापन केला....मला खुप आनंद झाला.....मि सुद्धा बऱ्याच group ला join आहे.....पण हा माझ्या ग़ावचा group आहे.....त्यामुळे विशेष आपुलकी......जिव्हाळा आहे.....बरेच वरिष्ठ कनिष्ठ सहकारी आहेत सर्वांसोबत शैक्षणिक, सामाजिक विषयी आदान प्रदान होईल........🙏🏻🙏🏻🙏🏻 आपलाच-- *जयदीप* 🙏🏻🙏🏻......



.क्रमशः

Post a Comment

0 Comments