शिक्षकांची बदली संगणकीय प्रणालीद्वारे करणे (Software) तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत.दिनांक : २५ मे, २०२१.


शिक्षकांची बदली संगणकीय प्रणालीद्वारे करणे (Software) तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत.दिनांक : 

ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.५०८/आस्था.१४, २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दिनांक : २५ मे, २०२१.

वाचा : १) ग्रामविकास विभाग, क्रमांक. जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दिनांक ०७/०४/२०२१,२) 
ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.५०८/आस्था.१४, २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दिनांक : २५ मे, २०२१.

वाचा : १) ग्रामविकास विभाग, क्रमांक.

जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दिनांक ०७/०४/२०२१,२) ग्रामविकास विभाग, क्रमांक, आंजिब-४८२०/ प्र.क्र.२९१/आस्था-१४, दिनांक ०७/०४/२०२१.

प्रस्तावना :

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत दिनांक २७.२.२०१७ व २४.४.२०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याकरिता श्री. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४.२.२०२० च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली होती.

त्यानुसार सदर समितीने सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याकरिता दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित केलेले आहेत.

शासन निर्णय :

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चि केले आहे. त्यानसार जिल्हा परिषद 
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्याकरिता संगणकीय आज्ञावली (Software) तयार करण्याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

सदर समितीने जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबविणेसंदर्भात खालीलप्रमाणे कामकाज करावे.

१. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी संपुर्ण संगणक प्रणाली तयार करणे.

२. संगणकीय प्रकियेसाठी लागणाऱ्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करणे.

३. सदर अंदाजपत्रकाप्रमाणे निधीची मागणी शासनास करणे.

४. जिल्हा परिषद शिक्षकांचे आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रकियेसाठी निविदा (टेंडर) प्रक्रिया राबविणे.

५. निविदा (टेंडर) प्रक्रिया करत असताना सातारा जिल्हा परिषद / महाIT/NIC / CDAC इत्यादी संस्थाची मदत घेण्यात यावी.

६. जिल्हा परिषद शिक्षकांचे अंतर जिल्हा व जिल्हा बदली प्रकियेसाठी तयार करण्यात आलेल्या संगणक प्रणालीची चाचणी करणेत यावी.

७. जिल्हा परिषद शिक्षकांचे बदली प्रकियेसाठी तयार करणेत आलेल्या संगणक प्रणालीचा प्रत्यक्षात वापर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०५२५१५४१०५४९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Post a Comment

0 Comments