Online रजेच्या अर्जाबाबत... शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव शिक्षक समिती...


eLeave च्या अंमलबजावणीबाबत दि. १ एप्रिल २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत- वस्तुस्थिती

दि. २८ मार्च २०२४ ला राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गत परिपत्रकानुसार १ एप्रिल २०२४ पासून कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज Online पाठविणे सक्तीचे केले आहे. रजेचे Offline अर्ज स्वीकृत करू नये अशाप्रकारचे आदेश शासनाने दिले आहेत. शिक्षकांच्या अनेक WhatsApp ग्रुपवरून सदर शासन परिपत्रक शेअर केल्या गेले असून त्याबाबत अनेक शिक्षक बांधव विचारणा करीत आहे.

याबाबतचे वास्तव-

राज्य शासनाने शासकीय/निम-शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके eHRMS (Human Resource Management System) प्रणालीनुसार डिजिटल करण्याची कार्यवाही सुरु केली होती.

मात्र जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगर पालिका अधिनस्थ कर्मचारी, शिक्षकांच्या सेवाविषयक नियमात बरेच साम्य असले तरी कामकाज कार्यान्वयन पद्धतीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाज पद्धतीच्या तुलनेत फार फरक आहे. शासनाने तयार केलेली eHRMS प्रणाली प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाज आणि अभिलेखे विषयक पद्धतीनुसार विकसित केली आहे. जिल्हा परिषद / नगरपालिका मध्ये सदर कामकाज पद्धती जशीच्या तशी लागू होत नाही. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या बाबतीत अर्जित रजा विषयक आणि नैमित्तिक रजेबाबत भिन्न नियम आहेत.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अजूनही Online होऊ शकलेली नाहीत. त्याप्रकारची सुविधा व दुरुस्ती अद्यापही eHRMS प्रणालीत झालेली नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांची सेवापुस्तके Online करण्याचा सक्तीने व मोहीम म्हणून केलेला प्रयोग पुरता फसला आणि त्यानंतर त्याबाबत पुढे काहीच प्रगती आजवर झालेली नाही.

परिणामी रजेचे अर्ज Online सादर करण्याबाबतचे शासन परिपत्रक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांच्या बाबतीत आज तरी लागू होत नाही. प्रचलित पद्धतच आपणास अवलंबावी लागणार आहे.

शिक्षक बांधवांच्या माहितीसाठी स्नेहादरपूर्वक...

1/4/2024 विजय कोंबे

Post a Comment

0 Comments