सर्व शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याचे पुरावे वेतन देयक, RTE नमुना नं.२ व इतर सर्व प्रस्तावासोबत सादर करणेबाबत.

सर्व शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याचे पुरावे वेतन देयक, RTE नमुना नं.२ व इतर सर्व प्रस्तावासोबत सादर करणेबाबत.



प्रति,
मुख्याध्यापक, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा जिल्हा छत्रपती संभाजीनगर

विषय :सर्व शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याचे पुरावे वेतन देयक, RTE नमुना नं.२ व इतर सर्व प्रस्तावासोबत सादर करणेबाबत..

संदर्भ : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक सुरक्षा-२०२४/प्र.प्र.२४३/एसडी-४ दिनांक २१. ऑगस्ट २०२४.

उपरोक्त संदर्भीय विषयी कळविण्यात येते की, शालेय विध्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे, त्या अनुषंगाने शासनाच्या संदर्भीय शासन निर्णयानुसार मार्गदर्शन सूचना प्राप्त आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने 
(१) शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
 (२) शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्ती अनुषंगाने घ्यावयाची काळजी 
(३) तक्रार पेटी 
(४) सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन 
(३) विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन इ. बाबत सविस्तर कार्यवाही नमुद केलेली आहे.

वरील शासन निर्णयानुसार आपणास सूचित करण्यात येते की, शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे तात्काळ आपल्या शाळेत कार्यवाही पूर्ण करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, या शासन निर्णयाचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास शाळेवर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येईल. यापूढे शाळेस बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ अन्वये दयावयाचे नमुना २ निर्गमित केले जाणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक 20240821151434582 असा आहे. तसेच सदर शासन निर्णयाची प्रत सोबत जोडली आहे. CCTV व तक्रार पेटी, बसवल्याचे रंगीत छायाचित्र सादर करावे.
तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्र तसेच सखी सावित्री समिती, विशाखा समिती, या दोन समिती सदस्यांची नावासह यादी संबंधित गटशिक्षणाधिकारी स्तरावर देण्यात यावे.

सोबत : संदर्भीय शासन निर्णय,
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments