सुधारित पेन्शन योजनेचे लाभ असलेला शासन निर्णय दि २०-०९-२०२४

पेन्शन योजनेबाबत....

 मार्च 2023 चा सात दिवसांचा संपाच्या पार्श्वभूमीवर या महायुतीच्या सरकारचे प्रमुख मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द , डिसेंबर 2023 चां संप तसेच29-09-2024 च्या संपाच्या पार्श्वभूमीवर

  शासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चे दरम्यान या सरकारने मान्य केलेल्या सुधारित पेन्शन योजनेचे लाभ असलेला शासन निर्णय आज दि २०-०९-२०२४ रोजी निर्गमित झाला.

जुनी पेन्शनसाठीचा लढा सुरूच राहणार

काहीच देण्याची शक्यता नसलेल्या सरकार कडून आपण बरेच काही पदरात आज पाडुन घेतले
 मा.एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द आज आपण संघटन शक्तीच्या बळावर पुर्ण करून घेतला

सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटनां समन्वय समितीच्या दीड वर्षापासून च्या मुसद्देगिरीतून जुनी पेन्शन योजना/१९८२-८४च्या पेन्शन योजनेतील "कपात बंद तथा आणखी काही लाभ वगळता" बाकीचे सर्व लाभ आपण प्राप्त करून घेतले आहे.

निमंत्रक विश्वास काटकर
तथा,सुकानू समिती सदस्य
विजय कोंबे,राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,युवा नेतृत्व,गणेश देशमुख
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना 
यांचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन व आभार
कर्मचारी अंशदान व त्यावरील व्याज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील
जय संघटनशक्ती!
आता "निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले की,त्यांनी विरोधी पक्षात असतांनाच वेळोवळी दिलेले जुनीच पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याचे आश्वासनही पुर्ण करायला भाग पाडूच"
शिक्षकांच्या साठी सुद्धा या शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकर व्हावी.
आज एक महत्त्वाचा पल्ला‌ गाठला आहे
"जुनी पेन्शन आता दूर नाही"

Post a Comment

0 Comments