विषयः-दिनांक ३० जानेवारी २०२६ हा दिवस " हुतात्मा दिन " पाळणे बाबत.
संदर्भ:- सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक जपुती २२२३/प्र.क्र. २३/कार्या, २९दिनांक २७.०१.२०२३.
संदर्भिय परिपत्रकान्वये गतवर्षी दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळुन हा दिवस" हुतात्मा दिन" म्हणून पाळण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. या वर्षी शासनाच्या सुचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. परंतु गतवर्षीप्रमाणे या वर्षीही" हुतात्मा दिन " पाळणे आवश्यक असल्याने खालील प्रमाणे कार्यवाही अनुसरावी.
१. आपले अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता कार्यालयात आपापल्या जागेवर स्थानापन्न होण्यास अवगत करावे.
२. हुतात्म्यांना आदाराजंली अर्पण करणे करिता मौन (स्तब्धता) ची सुरवात होण्यापुर्वी सकाळी ठिक १०.५९ पासुन ११.०० वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात यावा.
३. सदर इशारा भोंगा संपल्यानंतर अधिकारी/कर्मचारी /शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी/विद्यार्थी आदी सर्वांनी दोन मिनिटे (स्तब्धता) पाळावे.
४. सकाळी ठिक ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्या संबंधीचा इशारा भोंगा सकाळी ठिक ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात यावा.
५. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ठिक ११.०० वाजता मौन स्तब्धता पाळण्याबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती दक्षता घ्यावी.
६. हुतात्म्यांना आदराजंली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
राघवेंद्र घोरपडे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
0 Comments