विषय :- जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या स्वच्छतेबाबत
उपरोक्त विषयी आपणास निर्देशित करण्यात येते की, बीड जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळा देखील सार्वजनिक संस्थेचे ठिकाण आहेत. सदरील शाळांवर स्वच्छतागृहांची सोय केलेली आहे. परंतु सदरील स्वच्छतागृहाच्या स्वच्छता करण्यासाठी शाळेवर स्वच्छता कामगारांची नियुक्ती केलेली नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना शिपाई पद मंजूर नाही. त्यामुळे सदरील शाळांमधील स्वच्छतागृह स्वच्छते अभावी अस्वच्छ झालेले आहेत.
परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सदरील स्वच्छतागृह स्वच्छ करणेसाठी प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारामार्फत दररोज शाळेतील स्वच्छतागृहांची साफ सफाई करण्यात यावी. याकामी आपले स्तरावरुन संबधित संरपच, ग्रामसेवक यांना सुचित करावे. सदरील कामी हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जितिन रहमान (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड
0 Comments