दिनांक :- 04/02/2026
गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
विषय :- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणुक कर्तव्यातून सूट बाबत. संदर्भ :- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन यांचे प्रसिध्दी पत्रक दिनांक 03-02-2026
उपरोक्त विषयी संदर्भीय प्रसिध्दी पत्रकाची प्रत या सोबत देण्यात येत असून आपल्या तालुक्या अंतर्गत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणा-या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबधित जिल्हाधिका-यांना राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत.
त्या अनुषंगाने आपल्या तालुक्या अंतर्गत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणा-या शिक्षकांनाच सदरील कामातुन सुट देण्यात यावी व त्यांच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
सोबत :- संदर्भीय पत्राची प्रत
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छ. संभाजीनगर
प्रतिलिपी :-
1) मा. जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सविनय सादर.
2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सविनय सादर.
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छ. संभाजीनगर
0 Comments