प्रति,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
विषय :- उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे दिनांक 16 मार्च 2026 पासुन छत्रपती संभाजीनगर, जिल्हयातील शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबत.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत दिनांक 16 मार्च 2026 पासून शैक्षणिक वर्षाअखेर खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
1. एक सत्रात भरणा-या शाळांची वेळ सकाळी ...7... ते 12.30 वा. पर्यंत राहील.
2. शाळांची मधली सुट्टी 30 मिनिटांची असेल.
3. दोन सत्र पध्दतीने भरणा-या शाळांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
4. आर.टी.ई. अधिनियम 2009 नुसार नियोजित अध्यापनाच्या तासात कोणताही बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी.
5. वरील सुचनांनुसार अध्यापनाचे वेळापत्रक गटशिक्षणाधिकारी, यांनी निश्चित करावी व त्याप्रमाणे शालेय कामकाज होईल. याची क्षेत्रीय अधिकारी यांचे मार्फत खात्री करावी.
6. शासन निर्णय दि.29 एप्रिल 2011 नुसार शैक्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे यासाठी विहित केलेल्या निर्देश तत्वाचे उल्लंघन होणार नाही, खात्री करावी.
7. शाळेची वेळ कमी होत असल्याने या कालावधीत दररोज म्हणजेच सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ शाळा राहील.
अंकित भाप्रसे (मुख्य कार्यकारी अधिकारी)
अश्विनी लाठकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
0 Comments