माझी शाळा, माझे उपक्रम !!🌹🌺फुलांची शोभा वाढवा

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *_रंगनाथ सगर,लातूर_*
 ❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक  पँनल_* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *_माझी शाळा, माझे उपक्रम !!_* 〇  
      ════════════════
 *_🌹🌺फुलांची शोभा वाढवा🥀🌻_*    
━━━━━━━━━━━━━━━━
      फुलांची शोभा वाढवू या भाषिक खेळातून एकाच नामाला लागणाऱ्या विविध विशेषणांची ओळख होणे हाच मुख्य उद्देश आहे.
     *_💫भाषिक खेळासाठी सुचना💫_*
*_======================_*
🥀हा भाषिक खेळ एक वा अनेक मुलांना खेळता येतो.
🌹या खेळासाठी वेळ 5 मिनिटे.
🌻फुलांसंबधी वापरली जाणारी विविध विशेषणे शिक्षकांने किंवा गटप्रमुखाच्या मदतीने लिहायची आहेत. संकेतासाठी प्रत्येक विशेषणाचे पहिले अक्षर दिलेले आहे व बाकीची अक्षरे मुलांना भरावयाची आहेत.
🌺अक्षरे अशी भरा की विशेषणाचा योग्य शब्द तयार होईल.
🌷5 मिनिटांत जो मुलगा जास्तीत किंवा सर्व शब्द अचुक पणे भरेल. त्या मुलांस किंवा गटास विजयी करावे.
         *_उदाहरणार्थ_*
      🌼🌻 फुल🌺🌹
    *_विशेषणे:- रं :- रंगीबेरंगी._*
वरील उदाहरणाप्रमाणे *'फुल' या अक्षराच्या विशेषणाचे पहिले अक्षर 'रं'- रंगीबेरंगी* दिले आहे.
खाली *'फुल'* विशेषण अक्षरांचे पहिले अक्षर दिले आहे तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करा. 
*1) ट ➖.*    *2) प्र ➖.*   *3) सु ➖.*
*4) ट ➖.*      *5) मो ➖.*  *6) सुं ➖.*
*7) सु ➖.*      *8) ना ➖*.   *9) मो ➖*
                    *10) ता ➖*

            *_उत्तरे_*
*_1)टवटवीत 2)प्रफुल्लित 3)सुवासिक_*
*_4) टपोरे 5) मोहक 6) सुंदर_*
*_7) सुरेख 8) नाजूक 9) मोठे_*
              *_10) ताजे._*
      *_याच पध्दतीने मुलगा, देश, भाषा, घर, पर्वत, यासारख्या अनेक नामालाही कोणकोणती विशेषणे देता येतील त्यांची यादी तयार करून हसतखेळत मराठी व्याकरणाचा सराव देता येइल_*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments