दि. २६ जून २०२५
प्रति, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व
विषय- शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील मासिक केंद्रस्तर शिक्षण परिषदेबाबत
संदर्भ- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे जा.क्र.०३१३० चे दि. ०५/०७/२०२३ चे पत्र उपरोक्त विषयांन्वये पुणे जिल्ह्यातील मासिक शिक्षण परिषद जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल तसेच केंद्रस्तरावर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी घेण्यात यावी. एखाद्या शुक्रवारी शासकीय सुट्टी आल्यास चौथ्या गुरुवारी शिक्षण परिषदेचे नियोजन करावे. याची सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी नोंद घ्यावी.
शिक्षण परिषद आयोजित करताना खालील बाबींचे कटाक्षाने पालन करावे.
1. केंद्र स्तर शिक्षण परिषदेच्या दिवशी सकाळी शाळेच्या वर्ग अध्यापन करून, केंद्र स्तर शिक्षण परिषदा दुपारी १.३० ते ४.४५ पर्यंत घेण्यात याव्यात.
2. केंद्रनिहाय शिक्षण परिषदा प्रत्येक केंद्राच्या स्वतंत्रपणे घेण्यात याव्या परिषदा वेळेवर सुरू करून दिशादर्शक चर्चा घडवून आणणे,
3. केंद्रस्तर शिक्षण परिषदांमध्ये सत्कार समारंभ, वाढदिवस, शुभेच्छा समारंभ किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करू नयेत. शिक्षण परिषदेमध्ये केवळ शैक्षणिक विषयावर चर्चा व्हावी.
4. २७ जून २०२५ रोजी निपुण मुल्यांकन नियोजित असल्याने माहे जून ची शिक्षण परिषद नियोजित तारखांप्रमाणे दिनांक २८ किंवा ३० जून २०२५ रोजी घेण्यात घ्यावी.
5. विद्यार्थी गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने शिक्षण परिषदेत सकारात्मक चर्चा होईल याकडे लक्ष असावे.
6. प्रत्येक शिक्षकाकडे लेखन साहित्य, वही, कोरे कागद, पेन्सिल, रबर, पट्टी या सारखे आवश्यक साहित्य व इतर शैक्षणिक साहित्य, वर्ग अध्यापनाची पुस्तके सोबत असावी.
7. इयत्ता १ ली ते ८ वी सर्व शिक्षकांना शिक्षण परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी आदेशित करण्यात यावे.
8. आयोजनाच्या ठिकाणी LCD Projector, पिण्याचे पाणी, महिला व पुरुष स्वच्छता गृह व इतर भौतिक सुविधा असल्याची खात्री करावी.
9. शिक्षण परिषदेबाबत माहिती, सादरीकरण केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम (Success Stories) जिल्हा परिषदेच्या विनोबा app उपलोड कराव्यात.
10. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर सर्व केंद्र शिक्षण परिषदेला भेट देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेला विनोबा वर सादर करावेत.
संजय नाईकडे शिक्षणाधिकारी, (प्राथ.) जिल्हा परिषद, पुणे
एन. पी. शेंडकर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
0 Comments