▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*_रंगनाथ सगर,लातूर_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा, माझे उपक्रम_* 〇 ════════════════
*_🔸दप्तराविना शाळाअंतर्गत_*
*_चला हसत खेळत...!!!_*
*_ज्ञान वेचू या...!!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_विद्यार्थ्यीनी स्वतःची ज्ञाननिमिॅती करण्यासाठी विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती क्षमता विकसनासाठी,गणिती मुलभूत क्षमता विकसनासाठी हसतखेळत आणि कृती युक्त अध्ययन अनुभवासाठी हा ज्ञानरचनावादी उपक्रम आहे._*
*_हा उपक्रम पहिली ते आठवी वर्गापर्यंत घेता येतो.वर्गानुसार तिकीटाची किंमत वाढवावी._*
🔘 *_उपक्रमाची पुर्वतयारी_*🔘
=======★■◆●=======
*_🔹चार लाकडी काठयांची किंवा दोरीची गाडी बनविणे_.*
*_🔸तिकीट म्हणून झाडांच्या पानांचा किंवा खेळण्यातील नोटांचा वापर करणे._*
*_🔹नोटांच्या आकारांचे कोरे कागदाच्या नोटा तयार करावे व त्यावर नोटाची किंमत टाकावी_* *_जसे--एका कागदाच्या दोन्ही बाजूंनी 10रूपये असे लिहावे_*.
*_🔸विद्यार्थ्यांना स्वतःच्या नोटा स्वतः तयार करावयास सांगावे.सुटे पैसे म्हणून लहान लहान खडे वापरावे._*
*_🔹मोकाळया मैदानावर गाडीचा मार्ग निश्चित करून ठराविक अंतरावर बसस्थानके निश्चित करावे व गावच्या नावाचे पोस्टर बनवावे._*
*_उदा.गाडी लातूर ते सलगरा खुर्द असेल तर वाटेवर बाभळगाव ,बोरी,मुशिराबाद_.*
*_🔸विद्यार्थ्यांना गटागटात बसस्थानाकावर थांबवावे._*
*_🔹आपण ठरवून दिलेल्या वाहकाला आणि विद्यार्थ्यांना तिकाटासंबधी योग्य सुचना दयाव्या._*
📚 *_उपक्रमाची कार्यवाही_*📚
====================
*_🔹या उपक्रमाअंतर्गत एका विद्यार्थ्यांना वाहक नेमून सर्व सुचना दिल्या._*
*_🔸सर्व विद्यार्थी स्थानकानुसार गटात नेमुन दिलेल्या स्थानकावर थांबले._*
*_🔹उपक्रमामध्ये गाडी चालवताना गाडीचा वेग म्हणजे लाकडी बसच्या चौकटीत मुलांचे सहज चालणे आसल्याने ते एकमेकांशी मुक्त संवाद साधतात._*
*_जसे--तुम्ही कुण्या गावचे?_*
*_तुम्ही कुठे चालतात?तुमच्या गावला किती तिकीट आहे? उसने पैसे देता का? कंन्डक्टरला(वाहक)किती पैसे दिलात?तुम्हाला परत किती दिले?_*
*_🔹कागदी नोटा देवून वाहकांकडून तिकीट म्हणून झाडांची पाने घेणे._*
*_🔸सुटे पैसे ,उरलेले पैसे किती?_*
*_मुले कृतीतुन शिकतात आणि एकमेकांना शिकवताना दिसतात._*
*_🔹सुरवातीला मुले हसत पण शिकत होती.आता सवय झाल्यामुळे बसमध्ये बसल्यावर आपला स्टाँप येईपर्यंत भरपूर गप्पा मारतात._*
*_🔸उपक्रमाची फलनिष्पत्ती🔸_*
*=====================*
*_▪ सदरील उपक्रमातून व्यावहारिक ज्ञानाविषयी माहिती मिळते._*
*_▪दोन गावातील अंतर (कि.मी.)यांचा देखील मुलांना माहिती करून दिली त्यामुळे त्यांना अंतराचे ज्ञान अवगत झाले_.*
*_▪संवाद कौशल्य वाढीस लागले._*
*_▪लाजरी बुजरी मुले देखील बिनधास्तपणे बोलण्याची कला अवगत केली._*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*_रंगनाथ सगर, लातूर_*
*_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
📞 *_97 63 534721_* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments