आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार कार्यशाळा

*शिक्षण विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद आयोजित*
*🔥आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषद🔥*
   
आज दिनांक 11/12/2019 रोजी औरंगाबाद येथील रूक्मिणी सभागृह एम.जी.एम परिसर याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण विचार यासंदर्भात अतिउत्कृष्ट कार्यशाळा पार पडली.

आजच्या कार्यशाळेतील उल्लेखनीय बाबी..
*🔥सकाळी 10 ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत म्हणजेच 6:30 पर्यंत चालली कार्यशाळा.*
*🔥मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पवनीत कौर Madam यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन.*
*🔥 महाराष्ट्रातील वंचितांच्या शिक्षणाचा सुर्य मा.नंदकुमार साहेब यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून थेट मार्गदर्शन.*
*🔥तब्बल जिल्ह्यातील 850 शिक्षकांनी घेतला लाभ.*
*🔥निलेश घुगे सर यांचे  outstanding पेक्षाही outstanding तब्बल साडे तीन तास ओघवते मार्गदर्शन.*
*🔥औरंगाबाद जिल्ह्यात आज नंदकुमार साहेब यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणाची संकल्पना १००% रूजली.*
*🔥 शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल साहेब यांचे अप्रतिम आणि अप्रतिम आयोजन नियोजन.*
*🔥टिम वाबळेवाडी दिवसभर औरंगाबादच्या पंखात बळ भरत होती.*
*🔥 आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या विचारांचा खूप मोठा वणवा आज औरंगाबाद जिल्ह्यात पेटला आहे..ज्याचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.*


      💐प्रमुख उपस्थिती💐
  मा.पवनीत कौर(मुख्य कार्यकारी अधिकारी)
मा.सौ.मिनाताई शेळके(शिक्षण सभापती जिल्हा परिषद औरंगाबाद)
मा.सुरजप्रसाद जयस्वाल (शिक्षणाधिकारी प्राथमिक )
मा. डॉ.सुभाष कांबळे(संचालक राज्य आंग्लभाषा)
मा. निलेश घुगे (डायट वाशिम)
मा. सतीश वाबळे (ग्रामस्थ वाबळेवाडी)
मा.एकनाथ खैरे (शिक्षक वाबळेवाडी)

यावेळी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

* श्रीनिवास औंधकर
(संचालक डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम खगोल अवकाश केंद्र एम.जी.एम औरंगाबाद)..
यांनी खगोल शास्त्राबाबत माहिती देऊन आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व त्यात भारतीयांचे योगदान याबाबत माहिती दिली.एम.जी.एम परिसरातील खगोलशास्त्र विज्ञान केंद्रातील विविध दालनाबाबत यावेळी त्यांनी सखोल अभ्यास पूर्ण माहिती दिली.

     *💐प्रास्ताविक💐*
*मा.सूरजप्रसाद जयस्वाल साहेब(शिक्षणाधिकारी औरंगाबाद)*

💥वाबळेवाडी शाळेला भेट देणारे राज्यात सर्वात जास्त शिक्षक औरंगाबाद जिल्ह्यातील
💥औरंगाबाद जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न
💥जिल्ह्यातील पाच शाळांचा Design for change मध्ये देशातील पहिल्या १०० मध्ये क्रमांक
💥शिक्षणाधिकारी कार्यालय  गेल्या दोन वर्षांपासून पेपर लेस केले आहे.. 
💥जिल्ह्यातील पाच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवतील यासाठीची पूर्ण तयारी केली आहे
💥आज औरंगाबाद जिल्ह्यात एक ऐतिहासिक शैक्षणिक चळवळ निर्माण होत आहे याचा आनंद आहे

*💐मनोगत💐*
*डॉ.सुभाष कांबळे (संचालक राज्य आंग्लभाषा)*

💥वाबळेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतून निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहत आहे
💥शाळा आंतरराष्ट्रीय करणे व विद्यार्थ्यांना त्या पातळीवर शिक्षण देणे ही आजची गरज आहे
💥आता गरज आहे ती नव्या शिक्षणाचा वेध घेण्याची ..ती संधी आपण घ्यावी

*💐विशेष मार्गदर्शन*
*मा.पवनीत कौर(मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद)*

💥MIEB  हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे बोर्ड आहे.
💥उच्च दर्जाचे शिक्षण दिल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही.
💥समाजातील अनेक समस्या या शिक्षणाशी संबंधित आहेत..त्या शिक्षणातूनच सुटू शकतात.
💥औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी
💥बालरक्षक,Dense forest,design for change हे उपक्रम आम्ही खूप प्रभावीपणे राबवले 
💥जिल्ह्यात पाच शाळा आंतरराष्ट्रीय करायचे टार्गेट ठरवले आहे पण ते आता वाढणार आहे

*💐व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद💐*

*मा.नंदकुमार साहेब (माजी शिक्षण सचिव महाराष्ट्र)*

💥 व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला.
💥आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी व प्रत्यक्ष काम करण्याची तयारी औरंगाबाद जिल्ह्याने दर्शवली त्याबद्दल अभिनंदन
💥बदल हा निसर्गाचा नियम आहे.आपणही शिक्षणात बदल करणे आवश्यक आहे.
💥आपले ध्येय हे आंतरराष्ट्रीय शाळा बनवणे नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक
💥आज आपण शिक्षणावर लक्ष केंद्रित केले नाही तर २०५० साली आपल्या देशातील ५०%लोक useless होतील.
💥शिक्षकांने विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या भानगडीत न पडता त्यास शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा..
💥शाळेत जी मुले झपाट्याने शिकतात त्यांचा उपयोग मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी करणे आवश्यक


         *💐मार्गदर्शन💐*
*मा.सतीश वाबळे(ग्रामस्थ वाबळेवाडी)*

💥शाळा ही फक्त विद्यार्थ्यांसाठी असते हा विचार पहिल्यांदा केला पाहिजे
*💥डॉ.विजय भटकर यांनी वाबळेवाडी शाळेला भेट दिली.. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी शाळेला 11 Tab दिले व हीच माझ्या स्वप्नातील शाळा आहे असे गौरवोद्गार काढले
💥वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः रोबोट तयार केला.व त्याचा सादरीकरणात देशात 4 था क्रमांक आला.
💥वाबळेवाडीत अंगणवाडी दिवसभर भरते.आमचा सर्वात जास्त फोकस अंगणवाडी वर आहे.
💥विषय शिक्षक ही संकल्पना प्रभावीपणे राबवली तर शाळेत एकही मुल अप्रगत राहत नाही.
💥शाळेला गावातील नागरिकांचे व पालकांचे सहकार्य घेता आले पाहिजे.
💥शिक्षकांने ठरवले व योग्य दिशा दिली तर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्माण होऊ शकते.

*🔥मार्गदर्शक मनोगत🔥*

*मा.श्री.निलेश घुगे सर(वाशीम)*

💥आपल्याला १००% शाळा आंतरराष्ट्रीय करता येणार नाही परंतु १००%विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आपण नक्कीच देऊ शकतो.
💥आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण म्हणजे future ready students जे जगात कोठेही स्विकारले जातील.
💥आपला संपूर्ण फोकस Learning to learn असा पाहिजे यामुळे भविष्यातील सर्व प्रश्न सुटतील.
💥आपण जर स्वतः ला अपडेट केले नाही तर आपण भविष्यात useless झाल्याशिवाय राहणार नाहीत.
💥आज जागतिक स्तरावर दर दोन वर्षांनी दुप्पट माहिती वाढते. रोज 2500 नवीन App तयार होत आहेत.
त्यामुळे आपल्या शाळेतील विद्यार्थी आपण भविष्यात usefull होतील असेच घडवणे गरजेचे आहे.
💥प्रत्येक वर्गात ३ level ची मुले असतात.. त्यामध्ये 
1)PISA level 
2)NAS level 
3) ASAR level याचा विचार करूनच वर्गात विद्यार्थ्यांना शिकण्यास संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.

*💥आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण देण्यासाठी कामाची सुरुवात करण्याचे टप्पे*

  1)स्व पातळी स्वतः करावयाची कामे
  2)स्व +समाज
  3)स्व +समाज +भौतिक सुविधा
  4)स्व + समाज +भौ.सुविधा +प्रशासन

*💐शिक्षक आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण शाळेत या ६ गोष्टी करू शकतो💐*
1) मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित       करणे.
 2) मुलांना शिकताना आव्हान देणे.
 3)peer learning, group            
    learning व subject teacher              या ३ बाबींचा उपयोग करावा.
4) जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे.
5)1/3 वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणे.
 6) तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी करा.

🔥शेवटी वाबळेवाडी शाळचे शिक्षक एकनाथ खैरे गुरुजींनी संवेदनशील हाक देत ..चला आपण सर्व मिळून एका इतिहासाचे साक्षीदार बनूया अशी साद घातली.

कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी सुत्र संचालन श्री. प्रविण लोहाडे यांनी तर आभारप्रदर्शन श्री.महाजन साहेब यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.ठाकुर साहेब,जैन साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले.

भरत काळे (वरवंडी तांडा-२)

सतीश कोळी: 

*प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषद*
आज रूख्मिनी सभागृह औरंगाबाद येथे प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.
*आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीला दोन वेळेस भेट देऊनही खर्या अर्थाने वाबळेवाडी आज समजुन घेता आली नव्हे ती समजली.*
सकाळी १०-३० वा. सुरू झालेली हितगुज सायंकाळी ६-३० पर्यंत चालुनही शेवट पर्यंत सभागृह पूर्ण भरलेले असणे यातच सर्वकाही  समजेल.
सुरूवातीला MGM च्या खगोल अंतराळ विज्ञान केंद्रासंबंधी *श्री. श्रीनिवास औंधकर* यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रास्तविक करताना *मा.शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल साहेब* यांनी आजपर्यंतच्या औरंगाबाद जि.प.च्या इतिहासात सर्वाधिक निधी शिक्षण विभागाला प्राप्त करून दिल्याबद्दल मा.पवनीत कौर मॕडम यांचे आभार मानत शिक्षण विभागाच्या विविध योजनांसंबंधी माहिती दिली.
*जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पवनीत कौर मॕडम* यांनी स्वतः गाडिवाट व इतर शाळांमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती देत उपस्थितांना प्रेरणा दिली.
*वाबळेवाडी चे ग्रामस्थ श्री सतीश आण्णा वाबळे* यांनी २०१२ सालापासून वाबळेवाडी च्या शाळेची टप्प्याटप्प्याने झालेली वाटचाल,आलेल्या अडचणी त्यातुन काढलेले मार्ग याविषयी आपले अनुभव कथन केले.
मध्यंतरानंतर *श्री निलेश घुगे सर प्रा.शिक्षक (सध्या विषय सहायक डायट वाशिम)* यांनी जवळजवळ तीन तास आपल्या विनोदी शैलीत  आंतरमुख करित वाबळेवाडी शाळेची शिक्षण पध्दती व आपण वापरत असलेली अध्यापन पध्दती यातील फरक सहज समजावून दिला.
आंतरराष्ट्रीय शिक्षण का द्यायचे व कसे यावर सविस्तर मार्गदर्शन करताना असर,नास व पिसा या मूल्यांकनाच्या पध्दती व आपण करित असलेले अध्यापन याविषयीही अंतर्मुख व्हायला लावले.
*कामाची सुरूवात करताना ४ पातळ्यां विषयी मार्गदर्शन केले .*
१) स्व पातळी
२) स्व व समाज 
३) स्व समाज व भौतिक सुविधा 
४) स्व ,समाज,भौतिक सुविधा व प्रशासन
यातील स्व स्तरापासुन आपल्याला सुरूवात कशी करता येईल याचे टप्पे 
*१)मुलांना स्वतः शिकायला प्रेरित करणे.*
*२) मुलांना शिकण्यासाठी आव्हान देणे.*
*३) पॕडालाॕजीकल इंटरमेशन यात-*
१) Peer learning
२)  Group learning ३ ते ४ मुलांचा गट 
३) विषय मित्र 
*४) मुलांच्या जिज्ञासु वृत्तीचा सन्मान करणे*
*५) १/३ वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणे.*
*६) तंत्रज्ञानाचा उपयोग*

यासोबतच  Selfie with Success मोहिम याविषयी सविस्तर माहिती देत.आपणही आंतरराष्ट्रीय शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकतो हा आत्मविश्वास जागृत केला.
शेवटी *वाबळेवाडी चे शिक्षक श्री एकनाथ खैरे गुरूजी* यांनी वारे गुरूजींच्या प्रवासाची यशोगाथा वर्णन करून औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
*खरोखरच आपणही स्वतः पासुन सुरूवात करून आपल्याही शाळेतील मुले असर किंवा नास च नाही तर पिसा सारख्या परिक्षांसाठीच्या पात्रतेचे करू शकतो हा आत्मविश्वास आजच्या परिषदेने उपस्थित जवळपास ८०० शिक्षकांमध्ये जागृत केला म्हटलं तर वावगे ठरणार नाही.*
✍✍✍✍✍✍✍✍✍

Post a Comment

0 Comments