〇 *माझी शाळा,माझे उपक्रम〇
*📚दप्तराविना शाळा अंतर्गत📚*
*✒गणिती उपक्रम✒* ════════════════
*📚 संगीतातून अंकज्ञान📚*
━━━━━━━━━━━━━━━━
*मुलांना संगीत ऐकायला खूप आवडते. मुलांना संगीताच्या साह्याने ओळख करून दिली तर ती चिरकाल टिकते.*
*हा उपक्रम वर्गात किंवा मैदानावर घेता येतो.*
*🎶संगीतातून अंकज्ञानासाठी शैक्षणिक साहित्य🎶*
*==================*
👉 *मोबाईल,अंककाडॅ,फरशीवर किंवा बॅनरवर कोरी रिकामी आखणी*.
*✒उपक्रमाची कृती✒*
==================
🔹फरशीवर किंवा बॅनरवर लेखन करून घ्यावे.
🔸मुलांना अंककाडँ द्यावे.
🔹मोबाईल, टीव्ही,लाँपटापवर आपण जे अंकाचे दृढीकरण करणार आहोत ते अंकाचा व्हिडिओ किंवा mp3 चे गीत चालू करावे.
🔸एकाएका ओळीच्या अंकाच्या गीतावर मुलांना अंक ठेवावयास सांगावे.
🔹मुलगा रिकाम्या फलकावर अंक ठेवत असताना इतर विद्यार्थी अंकगीताप्रमाणे अंकाचे उच्चार करतील.
🔸अंकवाचनाच्या सरावानंतर फरशीवर खडू देऊन लेखनाचा पण आवाजप्रमाणे लिहुन घेऊन लेखनाचा सराव घेता येतो.
🔹1-100 अंकाप्रमाणे आपण या खेळाचा पाढयासाठी पण उपयोग करुन घेता येतो.
*✒उपक्रमाची फलनिष्पत्ती*✒
==================
🔹अंकवाचनाचा व वाचनाचा सराव होतो.
🔸विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मीती करतो.
🔹वाचनात किंवा लेखनात जर मुलगा चुकत असेल तर अन्य विद्यार्थी त्यास मदत करीत असतात त्यामुळे न दडपण घेता तो सहज हसतखेळत शिकत असतो.
🔹या गणिती खेळातून सहकार्याची भावना वाढीस लागते.
🔸स्वत: केलेल्या कृतीमुळेच शिकत असल्यामुळे ते चिरकाल टिकते.
🔹विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाशी देखील या उपक्रमाशी जोड घालता येते.
*या उपक्रमात शिक्षकांची भुमिका फक्त मार्गदर्शकाची.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments