माझी शाळा,माझे उपक्रम📚 चला पटापट लिहु या

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇   
    *📖लेखनक्षमता विकासासाठी एक अनोखा उपक्रम📚* ════════════════
 *📚 चला पटापट लिहु या....!!!! 📚*
━━━━━━━━━━━━━━━━
     लेखन ही मानवी जीवनाला मिळालेली आत्मप्रगटीकरणाची, आत्माविष्काराची व बुद्धीला चालना देणारी, भावस्पर्शी कला आहे.
इंद्रधनुष्याप्रमाणे लेखनाचा अनेक छटा आहेत. अशाच एका छटाचा मी लेखनक्षमता वाढविण्यासाठी वर्गात उपक्रम घेतला.
    *🔹उपक्रमाची सुरूवात🔹*
===================
🔸लेखनक्षमता विकासासाठी मनोरंजनातून विद्यार्थ्यांची वाढवावी म्हणून मुलांचे गट केले.
🔹फळ्यावर खालील प्रमाणे चौकट आखून दिली. 👇
1)अनुक्रमांक 2)नाव 3)गाव 4)आडनाव 5)फळ 6)फुल 7)सिनेमा 8)गुण.
         मुलांना आखून घेण्यास सांगितले.
🔸गटातील विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ज्यांचे नाव येईल त्या मुलाला एक अक्षर सांगायचे.
*उदा. 👉 'स'*
🔹गटातील सर्वानी 'स' ने सुरवात होणारे नाव, गाव, आडनाव, फळ, फुल, सिनेमा यांची नावे भरभर लिहायची.
🔸ज्या विद्यार्थ्यांने अक्षर दिले आहे त्याचे लिहून झाल्यावर तो थांबा म्हणेल. सर्वानी लेखन थांबवायचे.
🔹त्या मुलांने 'नाव' म्हणेल सर्वानी आपण लिहलेली नावे मोठ्याने वाचतील व गटात एकाने लिहलेले नाव दुसर्‍याने तेच लिहले आसेल तर पाच गुण व वेगवेगळे लिहले आसतील तर दहा गुण मिळतील व काहीच न लिहील्यास 0 असे आखलेल्या नमुना मिळालेले गुण लिहायचे.
🔸हा खेळ मुळाक्षरे संपेपर्यंत खेळता येतो.
🔹उदाहरणार्थ 👇
          'स' अक्षर आसेल
👉नाव-समीर.
👉गाव-सावरगाव.
👉आडनाव - सगर.
👉फळ-सफरचंद.
👉फुल-सदाफुली.
👉सिनेमा - सरफरोजी, सागर.
   असे दिलेल्या वेळेत लिहिल्यास गुण द्यावे.

    *🔸उपक्रमाचे फायदे🔸*
*===================*
🔸आपणास गुण जास्त लिहावे म्हणून लेखन लवकर करतील.
🔹माझा शब्द दुसरा कुणीतरी लिहील म्हणून नवनवीन शब्द शोधण्याची वृत्ती वाढते.
🔸गुणांची बेरीज करून नंबर काढायचा असल्यामुळे 'बेरीज 'करण्याचा सराव होतो त्यामुळे गणित विषयाची तयारी नकळतपणे आपोआपच होते.
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
          *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments