➖🕳♍💲🅿🕳➖
*_रंगनाथ सगर,लातूर_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा, माझे उपक्रम_* 〇 ════════════════
*_चला तर मग चिप्यातून !!_*
*_संख्या निमिॅती करु या..!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_विद्यार्थ्यी दुपारच्या मध्यान्हभोजनानंतर मुले मैदानावर खेळत आसतात. मुली चौकोन मारून चिप्याचा खेळ खेळत आसतात याच खेळाचा मी गणित विषयाची सांगड घातली._*
हा खेळ पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या वर्गासाठी घेता येतो.
*समजा माझा पहिलीचा वर्ग आहे.*👇
*१ ते ९ या घटकाचा सराव होण्यासाठी चिप्याच्या खेळातून संख्या वाचनाचा ... हा उपक्रम घेतला.*
*_या खेळातून विद्यार्थी अंक वाचनाचा सराव करु शकतात व हा खेळ स्पर्धात्मक आसल्यामुळे प्रत्येकास जिंकण्याची जिद्द निर्माण होते._*
*💠शैक्षणिक साहित्य💠*
======================
*:_👉 १ ते ९ या संख्याचे संख्या कार्ड, खडू, चिपी_.*
(आकृती पाहा)
*_तीन चिप्यावर एकक, दशक, शतक असे लिहिले._*
*_🔢उपक्रमाची कृती👆_*
*===============*
🥀हा खेळ मैदानावर व वर्गात पण घेता येतो.
🥀हा गणिती खेळ खेळण्यासाठी फरशीवर किंवा कागदी पुठ्ठावर चौकोनी आकार आखून घ्यावे.
🥀१ ते ९ अंक त्या चौकोनात लिहावेत.
🥀एकक,दशक,शतक असे लिहलेली चिपी किंवा ठिकरी घेऊन खेळाला सुरवात करावी.
उदाहरणार्थ :- रामला गटप्रमुखाने किंवा शिक्षकाने सांगितले सात तर राम सातच्या घरात तो चिपी टाकेल आणि लंगडत जाई. समजा चिपी सातच्या घरात पडली नाही किंवा संख्या ओळखता आली नाही तर तो बाद होईल व पुढच्या मुलांना संधी द्यावी.
🥀जो विद्यार्थी १ ते ९ हे चौकोन पुर्ण करेल तो विद्यार्थी विजयी होईल.
🥀प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना चिपी टाकण्याची संधी द्यावी.
*_याचप्रमाणे दुसरी ते आठवीसाठी चिप्याचा खेळ घेता येतो_*.
*_समजा माझा तिसरीचा वर्ग आहे मी संख्या सांगितले १३५._* *_तेव्हा शतक आसलेली चिपी १ वर, दशकाची चिपी ३ वर तर एककाची चिपी ५ वर टाकेल._*
जसे:-_*
शतक १ म्हणजे १००.
दशकाची ३ म्हणजे ३०
एककाची ५ म्हणजे ५
- - - - -
१३५
*_याचप्रमाणे वर्ग जसा वाढेल तसं हजार, दहाहजार अशा चिप्या गणिती खेळ घेता येतो_.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments