चला तर मग !!!गणिती खेळ खेळू या!

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
 〇 *माझी शाळा, माझे उपक्रम!* 〇        ════════════════
    *_चला तर मग !!!_*
        *_गणिती खेळ खेळू या!!!_*    
━━━━━━━━━━━━━━━━
   🌹       *गणिती खेळ*      🌹
           ==============
           *शाळेत मुलांना सतत पाच ते सहा तास बसणे कंटाळवाणे वाटते.या काळात शिक्षकांनी कितीही चांगल्या पध्दतीने अध्ययन अध्यापन केले तरी ते कंटाळवाणे वाटते.याच काळात आपण गणिती खेळ घेवू असे म्हणालो तर ते आनंदी होतात*.
        या खेळात शिक्षकांनी फळयावर कोणत्याही पाच अंक लिहावयाचे व या अंकाच्या साहयाने गणितातील संपूर्ण क्रियाला स्पर्श करता येतो.
    *हा उपक्रम 1 ली ते 8 वी पयँत घेता येतो.या उपक्रमात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची आहे.*
      *अंक--  5, 8, 7, 4, 9 .*
  *उपक्रम--1* वर्गानुसार मुलांना संख्या तयार करावयास सांगावे.उदा.पहिली वर्गासाठी एक अंकी,दुसरी साठी दोन अंकी,वर्गानुसार संख्याचा स्तर वाढवत जावावे.
     समजा तिसरीचा वर्ग असेल तर पाच तीन अंकी संख्या बनवा.
      *587,749,874,974* असे बनवितील.
   *उपक्रम--2* तयार झालेल्या अंकाचे अक्षरी लेखन करा.मुले जो अंक तयार केला आहे तो अक्षरांत लिहतील जसे.पाचशे सत्ताऐशी,सातशे एकोणपन्नास,या उपक्रमातुन भाषा विषयावर ही प्रकाश टाकता येतो.
    *उपक्रम--3* वरील संख्येतील सर्वात मोठी व लहान संख्या सांगा.
   *उपक्रम--4* तयार झालेल्या संख्याचा चढता,उतरता क्रम तयार करा/ लिहा.
   *उपक्रम--5* वरील.संख्या घेवून बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकाराची पाच उदाहरणे तयार करा.
   *उपक्रम--6* संख्याचे एकक,दशक,शतक सांगा.उदा.587--
  शतक- 5
दशक- 8
  एकक- 7
   *उपक्रम--7* नाणी व नोटा सांगा.
    समजा--587= 100च्या पाच नोटा,10च्या 8 नोटा,5ची एक नोट व 2ची एक असा लिहेल किंवा विदयार्थी आपल्या मजीँने नोटा व नाणी तयार करेल.
   *उपक्रम--8* सम व विषम संख्या सांगा.
   *उपक्रम--9*  पाच संख्याची बेरीज सांगा.
                *तसेच वर्गाच्या स्तरानुसार मुळ संख्या, संयुक्त संख्या, सहमुळ,जोडमुळसंख्या,पुर्ण वर्ग,निशेष भाग जाणारी संख्या सांगा असे अनेक गणिती उपक्रम हसतखेळत अध्ययन अध्यापन करता येतो*.
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments