फेब्रु-मार्च-२०२५ मा.शा.प्र. (इ.१०वी) व उ.मा.प्र. (इ.१२वी) परीक्षेतील विदयार्थ्याच्या बैठक कमांकापुढे Apaar ID ची नोंद घेणबाबत......

प्रति,
प्राचार्य / मुख्याध्यापक
सर्व मान्यता प्राप्त शाळा/कनिष्ठ
महाविदयालय

विषयः फेब्रु-मार्च-२०२५ मा.शा.प्र. (इ.१०वी) व उ.मा.प्र. (इ.१२वी) परीक्षेतील विदयार्थ्याच्या बैठक कमांकापुढे Apaar ID ची नोंद घेणबाबत......

संदर्भः

१) क.रा.म./ गणकयंत्र/पुणे/४५/१११९ दि.१९/०३/२०२५ रोजीचे पत्र
२) या कार्यालयाचे परिपत्रक जा. क. ४१२०/दि.२१/०३/२०२५

३) अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे यांनी दि.७/०४/२०२५ रोजी ऑनलाईन मिटींग मध्ये दिलेल्या सूचना.

उपरोक्त संदर्भिय पत्रास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, आपल्या शाळा/कनिष्ठ महाविदयालयातील फेब्रु-मार्च-२०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विदयार्थ्यांना निकालाच्या वेळी Digilocker मध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या APPAR ID च्या नोंदी करण्याबाबत सर्व शाळा / कनिष्ठ महाविदयालयांना कळविण्यात आले आहे, तथापि दिनांक ०९/०४/२०२५ पर्यंत नाशिक विभागातील सर्व शाळेतील ५५% विद्यार्थ्यांच्या व कनिष्ठ महाविदयालयातील ७०% विद्यार्थ्यांच्या Apaar ID ची नोंद केली असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

राज्यात सरासरी ८०% विदयार्थ्यांचे APPAR ID काढून झालेले आहेत. ज्या शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी APPAR ID ची नोंद अद्याप विदयार्थ्यांच्या बैठक क्रमांकापुढे केलेली नाही. अशा शाळा / कनिष्ठ महाविदयालयांनी उपलब्ध APPAR ID ची नोंद मंडळाच्या संकेतस्थळावर विदयाथ्यांच्या बैठक क्रमांकाच्या पुढे करण्यात यावी. जेणेकरुन APPAR ID उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांच्या Digilocker वर त्यांची गुणपत्रिका उपलब्ध करुन देता येईल.

त्यासाठी APPAR ID नोंदविणेकरीता राज्य मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर APPAR ID Updation ही Link उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याव्दारे दिनांक ११/०४/२०२५ पर्यंत परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ज्यांचा APPAR ID उपलब्ध आहे त्यांची नोंद करण्यात यावी.

Decem (एम.एस. देसले) विभागीय सचिव नाशिक विभागीय मंडळ, नाशिक

प्रत कार्यवाहीसाठी-
विभागीय शिक्षण उपसंचालक, नााशिक विभाग व शिक्षणाधिकारी (माध्य.) नाशिक/धुळे/जळगाव/नंदुरबार उपरोक्त प्रमाणे सर्व शाळा / कनिष्ठ महाविदयालयांना सूचित करून काम पूर्ण करण्यासाठी शाळानिहाय आढावा घ्यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा

Post a Comment

0 Comments