*शिक्षक संघटना समवेत शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे साहेब यांची बैठक संपन्न*
_संकलन सतीश कोळी_
_*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*_
~~~~~~ *srk* ~~~~~~
_आज मंगळवारी (दि. १५ एप्रिल २०२५) शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा केली._
_*१.* अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे._
_*२.* शाळा स्तरावरील १५ समित्या रद्द करून ४ समित्यांमध्ये कार्यान्वित ठेवणे._
_*३.* ऑनलाईन कामकाज कमी करणे._
_*४.* विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे._
_*५.* संचमान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे ..१५/०४/२०२४ संच मान्यता निकष शासन आदेश निकष दुरुस्ती करणे बाबत._
_या विषयांवर मा. शालेय शिक्षणमंत्री *ना. दादाजी भुसे* यांनी संघटनांना उत्तम मार्गदर्शन केले, सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे विचार व समस्या ऐकून घेतल्या व त्यावर अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्या संदर्भात आदेश दिले._
_या बैठकीसाठी शिक्षण आयुक्त *मा. सचिंद्र प्रताप सिंह*, SCERT चे संचालक *मा. राहुल रेखावार*, उपसचिव *मा. समीर सावंत*, उपसचिव *मा. तुषार महाजन*, प्राथमिक शिक्षण संचालक *मा. शरद गोसावी* उपस्थित होते._
_यावेळी *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* चे राज्य नेते *मा. उदयराव शिंदे*, राज्याध्यक्ष *विजय कोंबे*, राज्य कार्यालयीन चिटणीस *मा. किशोर पाटील*, राज्य कार्यकारिणी सदस्य *मा. विशाल कणसे*, साताऱ्याचे प्रतिनिधी *मा धिरेश गोळे* सहभागी झाले होते._
_महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने *विजय कोंबे* यांनी अशैक्षणिक कामे, शाळा स्तरावरील विविध समित्या, संचमान्यता, आधार आधारित संचमान्यता, शाळांतील विविध जुनी उपकरणे व वस्तुंचे निर्लेखन, शालार्थ वेतन प्रणाली, शाळांच्या भौतिक विकासासाठी आवश्यक सुविधा, BLO, U-DISE, Saral, Apar ID, SQAAF, शिक्षकांना ग्रामसभेसाठी दिल्या जाणाऱ्या नियुक्ती, घरकुल प्रमाणपत्र वितरण, ग्राम पंचायत प्रशासक अशा विविध विषयांवर भूमिका विशद केली._
0 Comments