शाळा प्रवेशोत्सवावेळी तसेच फेरीसाठी उपयुक्त घोषवाक्ये
▪️शिकाल तर टिकाल.
▪️लाजू नका, भिऊ नका, शिकायची संधी सोडू नका
▪️साक्षरतेचे एकाच ध्येय, निरक्षरांचे दूर करा भय.
▪️मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.
▪️मोळी विक, पण शाळा शिक.
▪️मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
▪️आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.
▪️जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.
▪️आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क.
▪️मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान.
▪️मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन.
▪️बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू.
▪️शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी.
▪️घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास.
▪️सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती.
▪️आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य.
▪️आधी विद्यादान, मग कन्यादान.
▪️देशाचा एकाच नारा, निरक्षरांना साक्षर करा. कंटे
▪️प्रगत जीवनाची नांदी, लोकशिक्षण घडवेल क्रांती.
▪️जबाबदार पालकांचे लक्षण, मुलांचे उत्तमशिक्षण.
▪️देशाचा होईल विकास, घेउनी साक्षरतेचा ध्यास.
▪️मुलगा, मुलगी एक समान, द्यावे त्यांना शिक्षण छान.
▪️काळी माती जीवन दायी, काळी पाटी, शिक्षणदायी.
▪️बालकांचे शिक्षण, देशाचे रक्षण,
▪️आमचा भारत साक्षर असो, साक्षर भारत संपन्न असो.
▪️अंगठा नको, आता सही करू, जीवनात आपल्या परिवर्तन करू.
▪️गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
▪️दिवसा पिकवू मळा, रात्री शिकू शाळा.
▪️माता होईल शिक्षित, कुटुंब राहील सुरक्षित.
▪️वाचावे लिहावे, सुखाने जगावे.
▪️सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार
▪️जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी.
▪️नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही ह्या शिकण्याची संधी.
▪️नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास.
▪️सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुर्तीचे शिक्षण हाच खरा आनंद.
▪️मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण.
▪️शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा.
▪️कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुर्लीना करा शिक्षणाचा आहेर.
▪️मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा.
▪️उद्याचा खरा आधार, हि अक्षरे हे आकडे, कणाकणांनी ज्ञान घेऊन चला नव्या शतकाकडे.
▪️कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून.
▪️मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.
▪️आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची.
▪️अंकूर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला.
▪️काळ बदलला तूही बदललीस चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस.
▪️भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी.
▪️बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान.
▪️लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं।
▪️हम भारत की किशोरियों, फूल भी है और चिंगारियाँ।
▪️जब तक सुरज चाँद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा ।
▪️स्त्रोत : व्हाटसप समूह
✍️: संकलन : ✍️
9158983616
0 Comments