विषय : अधिसंख्य पदावरुन नियमित पदावर वर्ग करणेबाबत दिनांक: ११/०७/२०२५

पुणे, दिनांक: ११/०७/२०२५

विषय : अधिसंख्य पदावरुन नियमित पदावर वर्ग करणेबाबत

आदेश :-
खालील नमुद अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले पोलीस अंमलदार यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत व अर्ज या कार्यालयास सादर केलेले आहे.

१. पोहवा (बियंचा) सोमिनाथ गांधले, गरापोबल गट क्र.७, दौंड
२. पोहवा (बियंचा) दिपीका नारायणराव मेघमाळे, नदिड
३. पोहवा (वीजतंत्री) अनंत नरहरी ठाकूर, बुलढाणा

वरील पोलीस अंमलदार यांना त्यांचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे जातीचे मुळ प्रमाणपत्र, मूळ जात वैधता प्रमाणपत्र सदर दोन्हीही प्रमाणपत्राच्या तीन सत्य प्रतीत (True Copy) व त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्याचे आदेशाच्या प्रती घेऊन दिनांक १५/०७/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. या कार्यालयातील आस्थापना शाखा २, प्रमुख लिपिक यांचेकडे समक्ष देण्यात याव्यात. वरील अंमलदारांना मा. पोलीस अधीक्षक, मुख्यालय यांच्या समक्ष हजर करावयाचे असल्याने ते शासकीय गणवेशात उपस्थित राहतील. तसे त्यांना लेखी आदेश देण्यात यावेत.

(मा. पोलीस अधीक्षक, मुख्यालय
यांचे आदेशाने)
(सीताराम जाधव)
पोलीस उप अधीक्षक, (मुख्यालय)
अपर पोलीस महासंचालक व संचालक कार्यालय, पोलीस दळणवळण व माहीती तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रति,
पोलीस अधीक्षक, बुलढाणा / नांदेड
समादेशक, रा.रा.पो.बल गट क्रं.७, दौंड

प्रत,

पोलीस अधीक्षक, पो.द.मा.तं., पश्चिम विभाग, पुणे/ मध्य विभाग, छ. संभाजीनगर / पूर्व विभाग, नागपुर
पोलीस निरीक्षक, पो.द.मा.तं., रारापोबल गट क्र.७, दौड
पोलीस निरीक्षक, पो.द.मा.तं., नांदेड
पोलीस निरीक्षक, पो.द.मा.तं.. बुलढाणा

Post a Comment

0 Comments