दिनांक १८/०७/२०२५
प्रति,
१) गट विकास अधिकारी (वर्ग-१) पंचायत समिती (सर्व)
२) गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती -(सर्व)
विषय :- प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यामध्ये संवर्ग २ च्या बदल्या बाबत.
संदर्भ :- ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. जिपब २०२३/प्र.क १८/आस्था- १४ दि.१८ जुन २०२४.
उपरोक्त विषयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सन २०२४-२०२५ साठी सुरू आहे. त्यामधील संवर्ग १ च्या बदलीचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता संवर्ग २ च्या बदल्यांसाठी पात्र शिक्षकांना पर्याय भरण्यासाठी शनिवार दिनांक १९/०७/२०२५ ते मंगळवार दिनांक २२/०७/२०२५ या चार दिवसांच्या कालावधीत संधी देण्यात आली आहे.
संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार सध्या जे पती-पत्नी ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहेत तेच या संवर्गा साठी पात्र आहेत व यापैकी जे शिक्षक अर्ज करणार आहेत त्यांनी आपल्या जोडीदारापासून ३० किलोमीटर अंतरातील शाळाच भरणे बंधनकारक आहे.
शासन निर्णयातील विवरणपत्र चार मध्ये सदर बाब नमूद आहे, तरी संवर्ग दोन मधील सर्व पात्र शिक्षकांनी आपल्या जोडीदारापासून ३० किलोमीटर च्या आतील जागा भराव्यात याबाबत संबंधितांना अवगत करावे. सर्वांनी वेळेच्या पूर्वीच पर्याय भरावेत, तसेच बऱ्याचदा पर्याय भरून झाल्यानंतर नजर चुकीने काही शिक्षक अर्ज विड्रॉल करून घेतात, ही चूक घडू नये याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात याव्यात. जर चुकीची अथवा खोटी माहिती भरून संवर्गाचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले तर संबंधितावर शासननिर्णयानुसार उचित प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची संबंधितांना जाणीव करून द्यावी.
(संजय नाईकडे) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद, पुणे.
0 Comments