14 एप्रिलनंतर सत्र 2019-20 मध्ये शाळा उघडण्यात येऊ

◾कोविड19 मुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे दिनांक 14 एप्रिल 2020 नंतर लगेच शाळा सुरू करणेबाबत तसेच इयत्ता 9 वि,11 वि च्या मूल्यमापनाबाबत व इयत्ता 10 वि च्या उर्वरीत विषयांच्या परिक्षेबाबत निर्णय घेणेबाबत व 10 व 12 वीच्या उत्तरपत्रिका मुल्यमापन बाबत मा उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे आदेश
▪️सदर आदेशानुसार 14 एप्रिलनंतर सत्र 2019-20 मध्ये शाळा उघडण्यात येऊ
नये.इयत्ता 9 वि,11 वि ची वार्षिक परीक्षा न घेता प्रथमसत्र परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थी यांना वर्गोणती देण्यात यावी.इयत्ता 10 च्या भूगोल व कार्यशिक्षण ह्या विषयाचे पेपर न घेता मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार गुण मिळणार.इयत्ता 10 वि व 12 वीच्या उत्तरपत्रिका संचारबंदीमुळे शिक्षकांना तपासणीसाठी संचारबंदी उठल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येईल▪️

Post a Comment

0 Comments