▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*सतीश कोळी खुलताबाद*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा,माझे उपक्रम_* 〇
*🏆भाषिक खेळ🏆*
════════════════
*📚 💯🏆 जुन्याचे नवे 🏆💯📚*
━━━━━━━━━━━━━━━━
*_सध्याला सर्वत्र लाॅकडाउनमुळे विद्यार्थी शाळेच्या शैक्षणिक प्रवाहापासून दुर गेला आहे. तो सध्याला घरीच आपल्यामुळे त्यांच्या बुध्दीला खुराक मिळावा या उद्देशाने "जुन्याचे नवे" या भाषिक उपक्रम आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीचा हा हट्टहास आपण आपल्या विद्यार्थी पालक गुपवर हा उपक्रम पाठवून द्यावा व उपक्रमाची यशस्वीता तपासून घ्यावी हीच विनंती._*
*🎍उपक्रमाचा उद्देश 🎍*
===================
जुन्याचे नवे या भाषिक उपक्रमचा मुख्य उद्देश मुलांनी स्वतः स्वनिर्मित तीन अक्षरी शब्द हसतखेळत तयार करणे हा आहे त्याबरोबर हे शब्द तयार करताना तो विविध वाक्य शोधण्यासाठी पुस्तकाशिवाय अवांतर वाचनाची देखील सवय लागणे हा आहे.
*🔸उपक्रमाची कृती🔹*
==============
🥀हा खेळ कितीही मुले व पालक मिळून खेळू शकतात.
🥀या भाषिक खेळासाठी दहा मिनिटे वेळ द्यावा.
🥀खाली तीन शब्दांची वाक्ये दिलेली आहेत. यांतील प्रत्येक शब्दात नवीन तयार होणाऱ्या शब्दांचे एक एक अक्षर लपलेले आहे.
🥀ते शोधून तीन अक्षरी नवीन शब्द बनवा.
🥀जो दहा मिनिटांत जास्तीत जास्त शब्द तयार करील तो विजेता किंवा हा भाषिक खेळ जिंकेल.
*_📽️उदाहरणार्थ📽️_*
================
उदाहरण. उत्तर
1) सर्वानी मानाने जगावे. 👉 *_समाज._*
2)कापूर जपून वापरा. 👉 *_काजवा._*
3)वहिनीने जयाला नटवले. 👉 *_वजन._*
4)आज वाचन जमले. 👉 *_आवाज._*
5)लता लहान नाही. 👉 *_ललना._*
यासारखे मुलांना नवनवीन वाक्य शोधण्याचा प्रयत्न करायला लावायचा व त्यापासून तीन अक्षरी अर्थ पूर्ण शब्द बनवण्यासाठी प्रेरीत करायचे.
*_नोट:- वर्गाच्या स्तरानुसार तीन, चार, पाच अक्षरी बनवण्यासाठी सांगावे._*
*🏆उपक्रमातून फलनिष्पत्ती🏆*
====================
💫विद्यार्थीनी स्वनिर्मित हसतखेळत शब्द बनवण्यासाठी किंवा प्रेरीत करणे. (स्वनिर्मितीचा स्वानंद)
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*सतीश कोळी, खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *91589 83616* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments