आज 23 एप्रिल.. जागतिक पुस्तक दिन.. त्या दृष्टीनं आजच्या दिवसाचं खास महत्व आहे..


जागतिक पुस्तक दिन : या दिवसामागे आहे रंजक इतिहास, कसा साजरा होतो हा दिवस..?
आज 23 एप्रिल.. जागतिक पुस्तक दिन.. वाचाल तर वाचाल, असं आपल्याकडं म्हटलं जातं.. कारण वाचनाने माणूस समृद्ध होतो.. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रगल्भ होतो.. त्या दृष्टीनं आजच्या दिवसाचं खास महत्व आहे..

लोकांची वाचनाची सवय वाढवणे, जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.. खरं तर अनेकांना आजच ‘वर्ल्ड बूक डे’ (World book day) का साजरा केला जातो, या दिवसाचं महत्त्व, हे माहित नाही. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

23 एप्रिलच का..?
विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यांसारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन 23 एप्रिलला झालं होतं. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘युनेस्को’ने हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. स्पेनमध्ये ‘मिगेल डे सर्व्हांटिस’च्या स्मरणार्थ 23 एप्रिल 1923 रोजी पहिल्यांदा पुस्तक विक्रेत्यांनी हा दिवस साजरा केला.

दरम्यान, 1995 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ‘युनेस्को’च्या सर्वसाधारण सभेत जगातील लेखकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा दिवस कसा साजरा होतो..?
प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. काही ठिकाणी विनामूल्य पुस्तकांची विक्री केली जाते. काही ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात. काही ठिकाणी वाचनालयांमध्ये एक दिवस मोफत पुस्तके वाचायला दिली जातात.

स्पेनमध्ये दोन दिवस ‘रीडिंग मॅरेथॉन’चं आयोजन केलं जातं. त्यातील विजेत्या लेखकाला प्रतिष्ठित ‘मिगेल डे सर्व्हांटिस’ पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा – महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.

Post a Comment

0 Comments