ऋणनिर्देश व ऋणानुबंध


_महाराष्ट्र शिक्षक पँनलचा पुणे येथील पार पडलेला आजचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा बाबत आपल्या ब-याच सदस्यांची प्रतिक्रिया वाचून आजचा कार्यक्रम हा निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील एक टाँपचा कार्यक्रम होता यावर शिक्कामोर्तब झाले._
 _आपल्या टिमचे वरिष्ठ सदस्य चामे सर सह सर्व सहका-यांच्या अचूक नियोजनामुळे मकरंद आहेर सर व त्यांच्या सर्व पुणे टिमने आपापली जबाबदारी स्वीकारुन ती यशस्वीपणे पार पाडली._
_दिवस रात्र एक करून एक एक साहित्य जमा करुन त्याचे  सभागृहात शोभिवंत असे दर्शन घडले._
_प्रवेशद्वार वरील सेल्फी स्डँड,देखणी रांगोळी पाहून प्रत्येकाचे मोबाईल आपसूकच खिशातून बाहेर पडत होते.त्यातच फक्त पुरुषांच्या नव्हे तर महिलांच्या डोक्यावर देखील पुणेरी पगडी छानपैकी शोभून दिसत होती._
_हलगीच्या तालावर व तुतारींच्या निदानात पुरस्कार्थीचा सन्मान म्हणून मिरवणूकीत कधी नव्हे अशा जोशात फुगड्या खेळण्याचा मनमुराद आनंद भगिनींनी घेतला._
 _सभागृहाबाहेर पुरस्कार्थीची वाजत गाजत मिरवणूक काढून प्रत्यक्ष आत पुरस्कार सोहळा कसा संपन्न होऊ शकतो? याचा अंदाज पुरस्कार्थी लावत होते._

_महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे  यांचे चिरंजीव यांनी गायलेले गीत लोकांना खुर्चीवर बसून ताल धरायला लावत होते.मेघाराणी जोशी मँडमच्या टीमचे कौतुक करावे ते थोडेच._
_स्टेजवरील स्क्रीनवर MSP चा असलेल्या लोगोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते._ _काळ्या ड्रेसवरील बाऊन्सर बाँईज & गर्ल्स कशासाठी हा प्रश्न अनेकांना पडला होता, त्याचे उत्तर कार्यक्रमात दिसुन आले._
_पुरस्कारार्थी व नियोजन ग्रुपवर चामे सर वारंवार, सुचना व नियोजन का शेअर करत होते?याचे उत्तर आता सर्वांना मिळालेच असेल._
_माझे थोडक्यात मांडलेले प्रास्ताविक, मनोगतासह,जतीन सर व प्रतिभा मँम यांच्या सुत्रसंचालनांची ती मधूर वाणी सर्वांच्या -हदयाचा ठाव घेत होती._
_सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड मँडम फक्त अभिनेत्री नसून एक दुरदृष्टी असलेल्या साहित्यिक ही आहेत हे जवळून अभ्यासता आले.आपल्या टीमच्या सदस्यांना पुस्तक प्रकाशीत करण्याची नामी संधी MSP ने उपलब्ध करून दिली. त्यातून आपले शिक्षक हे लेखक व कवी ही आहेत हे अधोरेखित झाले.  आमदार तांबे साहेब, आमदार काळे साहेबांनाही  एवढी गर्दी जमवतांना किती कसरत करावी लागते हे आमदारांनी गप्पांमध्ये बोलताना सांगितले. प्रत्यक्ष पुरस्कार सोहळा सुरु होण्यापुर्वी सगर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले उत्तम नियोजन पुरस्कार देतांना दिसुन आले.याचे नियोजन करताना या मंडळींना स्टेजवरचे देखने रुप  जरी पाहायचे भाग्य लाभले नाही तरी सर्व श्रेय हे त्यांना दिले पाहिजे.मुख्य कार्यक्रमापासून लांब राहून रावसाहेब राऊळ सर व चंद्रकांत गोरगिळे सरांनी नांवनोंदणी व फेटा कक्षाची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने उत्तम सांभाळल्याने महाराष्ट्राची परंपरा जोपासून पुरस्कार्थी च्या डोक्यावरचा फेटा बांधल्यामुळे पुरस्कार्थी चे व्यक्ती मत्व खुलून दिसत होते.पुरस्कार्थी व त्याच्या बरोबर आलेल्या मित्र,नातेवाईक यांचा गोतावळा फोटो काढताना सर्वांनी आपापल्या मोबाईल मध्ये टिपून घेतला._
_बिराजदार सर व सुडे सरांच्या फास्ट व सुसूत्रबद्ध सुत्रसंचालन मुळे 175 पुरस्कार अवघ्या 2 तासात आनंदाने पार पाडण्यास मदत झाली._
_कार्यक्रमाचे प्रसारण युट्युबवर live दाखवून विकी ऐलमटे सरांचे मोलाचे सहकार्य लाभले.पुरस्कारार्थींचा पुरस्कार स्विकारतानांचा तो त्यांच्या चेहऱ्यावरचा  आनंद पाहून आपल्या टीमचा गेल्या तीन महिन्यापासून केलेल्या श्रमाचा आनंद सर्व प्रमुखांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता._
_कुठेही हेवादावा नाही,कुठेही कामचुकारपणा नाही, कुणाचाही इगो न दुखवता,व कुणीही प्रमुख नसलेल्या या MSP  समुहाचा खुलताबाद ,लातूर व औरंगाबाद मध्ये आजपर्यंत पार पाडण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अनुभव पाठीशी असल्याने दिपक चामे सरांचे नियोजन कसे आहे हे अवघ्या महाराष्ट्राने पाहीले._
_.....आता आपली टीम कुठेही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडू शकते...हे याची देही याची डोळा अभ्यासता आले व तसा आत्मविश्वास निर्माण झाला._
_सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा यशस्वीपणे सपंन्न होऊन उत्साहाने पार पडला.असेच सहकार्य सर्व टीमच्या सहका-यांकडून आगामी काळात देखील अपेक्षित आहे अशी अपेक्षा बाळगतो._
_पुन्हा एकदा सर्व प्रमुखांसह मकरंद सर,त्यांच्या ग्रुहलक्ष्मी व संपूर्ण पुणे टीमचे  MSP Team कडून मनस्वी आभार, धन्यवाद,अभिनंदन Thanks._🙏
*_@सतिष कोळी,#_*
*_खुलताबाद(औरंगाबाद)_*

Post a Comment

0 Comments