*हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर जन्मदिन*
जन्म - २० एप्रिल १८८९ (ऑस्ट्रिया)
स्मृती - ३० एप्रिल १९४५ (जर्मनी)
जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म २० एप्रिल १८८९ ब्राउनाऊ अॅम इन येथे झाला. विसाव्या शतकातील जर्मनी देशाचा हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते. हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. 'एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज' हे त्यांचे घोष वाक्य होते.
ॲलॉइस व क्लारा हिटलर या दांपत्याचा अॅडॉल्फ हिटलर पहिला मुलगा होता. ॲलॉइस हिटलर छोटा लष्करी अधिकारी होता. आपल्या संघर्षकाळात याने काहीकाळ व्हियेनामध्ये हस्तचित्रे विकून रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन करुन उपजिविका चालवली. पहिल्या माहायुद्धात सैनीक म्हणून काम केले. पुढे थोड्यांच वर्षांत याने बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली.
जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले. हिटलरने "माईन काम्फ" आत्मचरित्रात 'नाझीवाद' स्पष्ट करताना दुसऱ्या भागात आपले आक्रमक परराष्ट्रीय धोरणाची माहिती देऊन त्याच प्रमाणे वागला.
हिटलरच्या जीवनावर अनेक चित्रपट आणि नाटके निर्माण झाली. मराठीतही डॉ. समीर मोने यांनी ’द डेथ ऑफ अ कॉन्करर’ या नावाचे नाटक लिहिले आहे. या नाटकात सुशील इनामदार यांनी हिटलरची, तर अतुल अभ्यंकरांनी गोबेल्सची भूमिका केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अजित भागत यांचे आहे.
बर्लिन शहर रशियनांच्या ताब्यात जात असताना त्यांनी आपली पत्नी इव्हा ब्राऊनसह ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या केली.

0 Comments