▬▬▬▬  🎧💻🎧 ▬▬▬▬
 〇 *_शाळा पुर्व तयारी अभियान मेळावा_* 〇 
═══════ 🦋;🦋 ═══════
  *_जिल्हा परिषद प्राथमिक शाळा_*
   **
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
      *●शाळापूर्व तयारी अभियान●*
                _जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा आज घेतला. सकाळी गावात *प्रभातफेरी* काढण्यात आली. आज  शाळेत *७ प्रकारचे स्टॉल* लावण्यात आले.सर्व स्टॉल हे विद्यार्थ्यांच्या *सर्वांगीण विकासाशी* संबंधित आहेत._ 

*1️⃣ स्टॉल क्र-१ नाव नोंदणी आणि रिपोर्ट कार्ड देणे:-*

             _पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले .त्यांचे वजन,उंची याची नोंद केली. पहिल्या गटाचे नेतृत्व शाळेचे सहशिक्षकxxxसरांनी केले_

*2️⃣स्टॉल क्र-२ शारीरिक विकास:-*

               _स्टाॅल क्रमांक 2 वर अंगणवाडी ताई  अनिता कांबळे होत्या. त्यांनी नवीन आलेला मुलांना हसतखेळत खेळ घेतला यामध्ये दोरीच्या उड्या, दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे,कागदाच्या साहाय्याने होडी तयार करणे,रंग भरणे,चेंडू बादलीत टाकणे अशा वेगवेगळ्या कृतींचे आयोजन करून मुलांचा शारीरिक विकास कितपत झालेला आहे हे तपासाले.यात मुलांना मदतीची गरज आहे का किंवा तो चांगले करतो/करते याप्रमाणे नोंद करून रिपोर्ट कार्ड तिसऱ्या गटाकडे दिला._

*3️⃣स्टॉल क्र-३ बौद्धिक विकास:-*

     _या स्टॉलच्या प्रमुख आदरणीय अंगणवाडी मदतणीस जयश्री कांबळे या होत्या त्यांनी नवीन प्रवेशासाठी आलेल्या मुलाकडून लहान-मोठा फरक ओळखणे,२ प्रकारांमध्ये वर्गीकरण(जसे-फळे व पक्षी),दिलेल्या वस्तू-चित्रे क्रमाने लावणे,जोडी लावणे या क्षमतांची विकास मुलामध्ये कितपत झाला यांची चाचपणी केली._

*4️⃣स्टॉल क्र-४ सामाजिक आणि भावनात्मक विकास:-*

        _चौथ्या स्टाॅल चे नेतृत्व सातवी वर्गातील जान्हवी पाचांळ व लक्ष्मी शिंदे यांनी केले यामध्ये घरी राहिल्याने मुलांमध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकास कशा पद्धतीने झाला हे तपासले. यात मुलांनीआपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे,स्वच्छ आणि नीटनेटके राहणे,धीटपणे बोलणे या क्षमतांची आपण नोंद घेतली व कार्ड पुढील स्टाॅल कडे पाठवून दिला._

*5️⃣स्टॉल क्र-५ भाषा विकास:-*

       _भाषा विकास स्टाॅल क्रमांक 5 वर रंगनाथ सगर हे होते. यात त्यांनी मुलांना चित्र पाहून वर्णन करण्यास सांगितले , गोष्ट सांगणे,अक्षरे ओळखणे,अक्षरे पाहून ओळखणे या क्षमतांची नोंद कार्ड वर केली आणि ते कार्ड व विद्यार्थी पुढील गटाकडे सोपवला._

*6️⃣स्टॉल क्र-६ गणनपूर्व तयारी:-*

    _गणन पुर्व तयारी गटाचे प्रमुख राजु पिट्टलवाड सरांकडे होते. यात त्यांनी मुलांना कमी-जास्त ओळखणे,आकार ओळखणे,अंक ओळखणे,वस्तू मोजणे या क्षमता मुलांत कितपत रूजलेल्या आहेत यांची तपासणी केली व नोंद केलेले कार्ड पुढे दिले._

*7️⃣स्टॉल क्र-७ मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन:-*
    _यामध्ये सर्व नोंदी तपासून त्यानंतर सर्व मुलांना व पालकांना मार्गदर्शन करुन त्यांना साहित्य दिले._

               _तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत स्टॉल उभारण्यात आले व आनंदी वातावरणात शाळा पुर्व तयारी व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले._
      *_हा मेळावा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक 


व अंगणवाडी ताई, सहशिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले._*

          𖠷◈═══❀═══◈𖠷  
                *_शब्दांकन_*
   *_जिल्हा परिषद प्राथमिक शाळा_*
     * केंद्र _* 
        *_ता. जि. * 
   *_📱   📲_*      
▂▃▅▓▒░🔸🔸░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments