_*महा.राज्य प्राथ.शिक्षक समितीच्या वतीने उपस्थित केलेल्या केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त पदभाराबाबत सुचना..*_
_मा.शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.लातूर यांचे दि.3/11/2023 चे पत्र_
~~~~~~ *srk* ~~~~~~
_१) सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या पदाच्या केंद्रप्रमुखास त्यांच्या लगतच्या केंद्राचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा. एका केंद्रप्रमुखाला एकापेक्षा जास्त केंद्राचा अतिरिक्त पदभार देण्यात येवू नये._
_२) उर्वरीत केंद्राचा अतिरिक्त पदभार देताना त्या केंद्रातील प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर व प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर पदातून पदोन्नतीने मुख्याध्यापक झालेले मुख्याध्यापक या दोन पदाच्या कर्मचा-यांची त्यांच्या मूळ नेमणूक दिनांकाच्या तारखेची सेवाजेष्ठता यादी तयार करुन त्यातील सेवाजेष्ठ प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर / मुख्याध्यापक जे पात्र ठरतील त्यांच्याकडे केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा._
_३) आंतरजिल्हा बदलीने जि.प.लातूर येथे रुजू झालेल्यांची जेष्ठता ते लातूर जि.प. येथे रुजू झालेल्या तारखेपासूनची गृहीत धरावी._
_४) केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्या कडील विषयाचे शालेय कामकाज पूर्ण करुन सदर पदाचा पदभार देत असल्याचे आदेशात नमुद करावे._
_फक्त माहितीस्तव🙏_
_*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*_
0 Comments