_*शालेय आवारात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय पर्यवेक्षीय यंत्रणा यांचे व्यतिरिक्त अन्य कोणासही शाळेमध्ये किंवा शालेय आवारात प्रवेश करण्यास वा चित्रीकरण करण्यास संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय अन्य व्यक्तीस मान्यता न देणे बाबत*_
_संकलन- *भद्रा मारुतीहून MSP*_
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सांगली यांचे सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश. दि.१५/१०/२०२३ चे पत्र
~~~~~~ *srk* ~~~~~~
_काही शाळांमध्ये शालेय कामकाजाशी संबंधित नसणा-या व्यक्ती विनापरवाना शाळेत येऊन शालेय कामकाजामध्ये हस्तक्षेप करणे, विद्यार्थ्याचे चित्रीकरण करणे त्याचा वापर शाळांच्या अपप्रचारासाठी करणे, त्या आधारे शालेय व्यवस्थापनास धमकावणे इ. बाबी करताना दिसून आले आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस व शैक्षणिक वातावरणास बाधा पोहोचवणारी आहे._
_बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ ( POCSO) च्या कायदयातील कलम २२ (१) नुसार "कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचे प्रसार माध्यम, स्टुडिओ किंवा फोटोग्राफी सुविधांच्या माध्यमातून कोणतीही परिपूर्ण किंवा प्रमाणीकृत माहितीशिवाय कोणत्याही बालकासंबंधी कोणताही अहवाल देणार नाही किंवा कोणतीही टिप्पणी करणार नाही ज्यायोगे बालकाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल किंवा त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन होवू शकते" अशी कायद्यात तरतूद आहे._
_भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३ नुसार " लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे. " हा गुन्हा आहे._
_या दृष्टीने या परिपत्रकाव्दारे जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय आवारात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय पर्यवेक्षीय यंत्रणा यांचे व्यतिरिक्त अन्य कोणासही शाळेमध्ये किंवा शालेय आवारात प्रवेश करण्यास वा चित्रीकरण करण्यास संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय अन्य व्यक्तीस मान्यता देता येणार नाही._
_प्रतिलिपी :-_
_*गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)*_
_(तृप्ती थोडमिसे भा.प्र.से.)_
_*मुख्य कार्यकारी अधिकारी*_
_जिल्हा परिषद सांगली._
0 Comments