विषयः *तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था केलेल्या सर्व शिक्षकांना पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यमुक्त करणे बाबत,*
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, *कन्नड तालुक्यातील ज्या शाळेवर शिक्षकाची अत्यंत निकड आहे अशा शाळेवर या कार्यालयाकडुन तात्पुरत्या स्वरुपात इतर शाळेवरुन शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था केलेल्या आहे. अशा तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था केलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्या रदद करण्यात येत आहे.*
तेव्हा सर्व मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा. कें.प्रा.शा./प्रशाला अंतर्गत कन्नड तालुका यांनी *ज्या शाळेवर शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था केलेली आहे अशा सर्व शिक्षकांना दि.30/04/2024 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करावे, व सबंधित शिक्षकांनी त्यांच्या मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजु व्हावे.*
दिनांक *01 मे 2024 पासून कोणत्याही शाळेवर प्रतिनियुक्ती तात्पुरती व्यव
स्था अथवा इतर कारणामुळे एकही शिक्षक राहणार नाही याची सबंधित मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी.*
स्था अथवा इतर कारणामुळे एकही शिक्षक राहणार नाही याची सबंधित मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी.*
गटशिक्षणाधिकारी प्रतिलिपीः मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक). जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना सादर.
*गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कन्नड*

0 Comments