फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करणेबाबत
* प्रकटन
➡️ फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा)- लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी- मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५
• प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा- शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
२) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा - शुकवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
• प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा- सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५
• उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.२१/११/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिनांक: 29.22.2027
(देविदास कुलाळ)
सचिव,राज्यमंडळ, पुणे ४.
0 Comments