आज 12 जानेवारी हा कै.भानुदास वालचंद शिंपी उर्फ भा.वा. शिंपी गुरुजी यांची पुण्यतिथी यांचा जन्म खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात उंदीरखेडे गावी 3 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. कुटुंबाच्या परिस्थितीने त्यांनी 1948 साली प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली अन्यायाची चीड असलेला माणूस मरेपर्यंत स्वाभिमानी राहिला कुठल्याही पदाची हाव न ठेवता स्वार्थ न ठेवता अन्याय विरुद्ध आवाज उठवत राहिला आणि हा स्वभाव त्यांना गप्प बसून देत नव्हता म्हणूनच त्यांनी प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागताच "मुंबई राज्य विद्यार्थी शिक्षक समितीची" स्थापना भा.वा. शिंपी गुरुजी आणि वि.भा. येवले गुरुजी यांनी केली. बरोबर असणारे सवंगडी स्वाभिमानी आणि जिवाभावाचे होते. तेव्हा त्यांनी ड्युटी पे कमिशन वर काम सुरू केले. प्रत्येक कार्यकर्त्याकडून 25 पैसे वर्गणी गोळा करून 14 नोव्हेंबर 1961 मध्ये पुण्यात शनिवार वाड्यासमोरील मारुती मंदिरात आमरण उपोषण सुरू केले. गुरुजींची तब्येत अतिशय बिघडली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर एस. एम. जोशी आणि त्या वेळचे शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांनी रुग्णालयात जाऊन गुरुजींची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिले आणि तो विषय मार्गी लागला अशा अनेक गोष्टी जीवावर घेऊन गुरुजींनी काम केले नागपूर अधिवेशनावर सात हजार शिक्षकांचा मोर्चा काढण्याचा प्रयत्न शिंपी गुरुजींनी केला तेव्हा जमावबंदी आदेश लागू केल्याने मोर्चा काढता आला नाही परंतु तत्कालीन आयुक्तांनी देशाच्या पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांची शिंपी गुरुजींच्या शिष्टमंडळांबरोबर चर्चा घडवून आणली आणि भा.वा. शिंपी गुरुजींनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या समोर ड्युटी पे कमिशनचा विषय मांडला पटवून दिला तेव्हा तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री एम. सी. छागला यांनी सर्व विषय ऐकून घेतला आणि ड्युटी पे कमिशनचा विषय मार्गी लागला. आणि या लढाईमध्ये शिंपी गुरुजींचा आणि शिष्ट मंडळाचा विजय झाला. अशा अनेक गोष्टी मित्रांनो गुरुजींनी कशाचा विचार न करता आपल्या सर्व शिक्षकांसाठी केल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिंपी गुरुजी आणि त्यांच्या जीवाभावाच्या सर्व मित्रांनी विचार करून पुणे येथे गोखले हॉल ला 1000 शिक्षकांच्या उपस्थितीत 22 जुलै 1962 रोजी "मुंबई राज्य विद्यार्थी समिती" विसर्जित करून "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची" स्थापना केली. शिक्षकांच्या अडचणी आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी काम करायचे "त्याग आणि सेवा" "न्यायाची चाड, अन्यायाची चीड" या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन सर्व मावळ्यांनी शिक्षक विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असे ध्येय ठेवून काम करायला सुरुवात केली या कामात वि.भा. येवले गुरुजी, जॉन रोड्रिक्स, आंग्रे, नवीन माने, हजारे, पुरी, काळंगे, सांडभोर, राणे, काळे कराड, आणि इतर सर्वांनी स्वतःला झोकून देऊन गुरुजींच्या बरोबर तन-मन-धन अर्पून काम केले राज्याच्या पहिल्या अधिवेशनात श्री. दत्तो वामन पोतदार यांची राज्याध्यक्ष म्हणून निवड केली. आणि वि.भा.येवले गुरुजी यांची सरचिटणीस म्हणून निवड केली आणि स्वतः कार्याध्यक्षपदावर काम करत राहिले परंतु पदाचा कधीही त्यांनी अपेक्षा केली नाही त्या काळामध्ये अनेक आंदोलने करून शिक्षकांना पेन्शन ग्रॅच्युइटी मंजूर करण्यात यश आले आणि त्याच कालावधीमध्ये गुरुजींच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र सरकारकडे वेतन मंडळाची मागणी केली आणि नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचे ठरवले आणि त्याच वेळी नागपूर अधिवेशनावर 29 नोव्हेंबर 1964 रोजी तीन हजार शिक्षकांचा विराट मोर्चा काढला याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने वेतन मंडळ नियुक्त करण्यासाठी बडकस आयोगाची स्थापना केली. असे प्रभावी काम शिक्षक समितीने आजवर केलेले आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड आग्रहास्तव दुसऱ्या राज्य अधिवेशनात गुरुजी राज्याध्यक्ष झाले जिल्हा परिषद अधिकारी आणि पदाधिकारी यांना गुरुजींच्या कार्याचा त्रास होऊ लागला आणि मग अधिकारी पदाधिकारी गुरुजींना त्रास देऊ लागले या स्वाभिमानी बाण्याच्या व्यक्तीस हुजरेगिरी पसंत नव्हती आणि अखेर त्यांनी 1965 रोजी शिक्षक पदाचा नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. आणि पूर्णपणे समितीच्या कार्यात झोकून दिले. सलाम त्या स्वाभिमानी व्यक्तिमत्वास आणि नंतर मात्र पूर्ण ताकतीने शिक्षक समितीचे काम सुरू झाले. त्यानंतर शिक्षकांना बोनस असो इतर आर्थिक तरतुदी असो या सर्व जोमाने लढा देऊन मिळवून दिले शेवटी 1977 मध्ये पुण्यात हडपसर येथे राज्य कार्यकारिणीच्या सभेत गुरुजींचे शेवटचे भाषण झाले 14 डिसेंबर 1977 च्या बेमुदत संपात शिक्षक समिती पूर्ण ताकतीने सहभागी झाली. शेवटी 2 जानेवारी 1978 रोजी घरी येत असताना दुपारी बारा एक च्या दरम्यान शिंपी गुरुजी चक्कर येऊन पडले त्यांना के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी लढवय्या कार्यकर्त्याने 12 जानेवारी 1978 रोजी जगाचा निरोप घेतला आणि शिक्षक समिती एका झुंजार नेतृत्वास हरपली तो दिवस शिक्षक समितीसाठी दुःखाचा दिवस उजाडला. *"सत्कर्माच्या दिव्य फुलांनी ! देव पूजीला ज्यांनी! अनंत तयाची स्मरण यात्रा! कधी न सरे मरणांनी!"* *अशा पवित्र आत्म्यास आदरांजली वाहने हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे.म्हणूनच आपल्याला यायचे आहे. धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपला नम्र... श्री.सतीश कोळी
मराठवाडा विभागीय प्रसिध्दीप्रमुख
शिक्षक समिती छत्रपती संभाजीनगर
0 Comments