वर्ग 5 वी / 8 वी नियमित शुल्कासह शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..

वर्ग 5 वी / 8 वी नियमित शुल्कासह शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत (दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. 832 ए, शिवाजीनगर, पुणे 411 004

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.

उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे-
शुल्क प्रकार-नियमित शुल्कासह (With Regular Fee
कालावधी-१७ ऑक्टोबर २०२४ ते
नियमित शुल्कासह (With Regular Fee)
०७ डिसेंबर २०२४

विलंब शुल्कासह (With Late Fee)-०८ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४


अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee) - १६ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४

अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee)- २४ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४

दि. ३१/१२/२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments