प्रति,
मा. महासंचालक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
तळमजला, मंत्रालय,
मुंबई- 400 032.
विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2025 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत....
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 17/10/2024 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ०७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२४ पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत : प्रसिध्दीपत्रक
आपली विश्वासू,
(अनुराधा ओक) आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.
प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी :-
1. जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
2. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका.
3. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
4. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम दक्षिण / उत्तर).
5. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
6. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व,
प्रत माहितीस्तव :- 1.मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32.
2. मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 01.
3. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, महाराष्ट्र राज्य,
4. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे 01.
5. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे- 01.
6. मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे 01.
7. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग), महाराष्ट्र राज्य
0 Comments