10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत ..पुढील आदेश होईपर्यत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.अहिल्यानगर, दि. 09/12/2024

अहिल्यानगर, दि. 09/12/2024

प्रति,
गट शिक्षणाधिकारी
पंचायत समिती (सर्व)

विषय :- 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत ..

संदर्भ :-
1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र.संकीर्ण-2024/प्र.क्र.666/टिएनटि-1, दि. 23 सप्टेंबर, 2024
2. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्र क्र. आस्था-क/प्राथ-106/ 10 प शाळा/ शिक्षक/2024/6127, दि. 07/10/2024
3. या कार्यालयाकडील पत्र क्र. वशि/कार्या-1/पीई-1/1895/2024, दि. 05/12/2024
4. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील व्हि. सी. दि. 05/12/2024 मधील समक्ष सूचना

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणेबाबत संदर्भ क्र. 01 व 02 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने या कार्यालयाकडील सदंर्भ क्र. 03 चे पत्रान्वये याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत आपणास सविस्तर निर्देश देण्यात आलेले आहेत. तथापि मा.शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील दि. 05/12/2024 व्हि. सी. मध्ये समक्ष दिलेल्या सूचनेनूसार 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणेबाबत सदंर्भ क्र.03 चे पत्रान्वये दिलेल्या निर्देशानूसार पुढील आदेश होईपर्यत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.

यासंदर्भात मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

(भास्कर पाटील) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अहिल्यानगर
प्रत - गट विकास अधिकारी, पंचायत समिती... (सर्व)

Post a Comment

0 Comments