जनरल रजिस्टर मध्ये खाडाखोड करणे गुन्हा आहे १३/१२/२०२४

प्रति,
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सर्व

विषय :- मुख्याध्यापक यांचेकडील शालेय जनरल रजिष्टर मध्ये खाडाखोड / नात नोंदीमध्ये बदल होत असलेबाबत

संदर्भ : १. संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा जा.क्र. जिजाप्रससा/अभि. पडताळणी त्रुटी/३११२/२०२४ दिनांक- ०९/१२/२०२४

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांचेकडे सातारा जिल्हा कार्यक्षेत्रामधून विविध प्रयोजनार्थ जातीचे दाखले पडताळणी विषयक प्रस्ताव प्राप्त होतात. प्रस्तावामध्ये हे त्यांच्या जातीदाव्यापृष्ठयं शालेय अथवा महसूली पुरावे सादर करतात. बहुतांशी प्रकरणामध्ये अर्जदार त्यांच्या वंशवेलीमधून पुरावेधारक यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे जाती दावा शाबीत करतात.
तथापि, दाखल्यावरती दिसून येणा-या खाडाखोड/अक्षरबदल/पुनर्लेखन अशा बावीस अपवादात्मक प्रकरणातील दाखले संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे पडताळणीस्तव पाठवले जातात. ब-याच प्रकरणांमध्ये अभिलेख पडताळणो केली असता मूळ जनरल रजिस्टर मध्ये नोंदी व्यतिरिक्त इतर नोंदी नमूद करून शाळा सोडल्याचा दाखला निर्गमित झाल्याचे वरेचसे प्रकार समितीच्या निदर्शनास आलेले आहेत.

जाती पडताळणी प्रक्रियेमध्ये शाळा सोडल्याचा दाखल्यास अनन्य साधारण महत्व असुन समितीचा शालेय अभिलेख जतन करणाऱ्या आपलेकडील व्यवस्थापन यंत्रणेवर असलेली प्रचलित विश्वासार्हता लक्षात घेता सर्वच प्रकारात चिंताजनक आहे व अशा पध्दतीने मुख्याध्यापक यांनी जनरल रजिष्टर / शा.सो.दा मध्ये बदल करणे हा गुन्हा आहे. अशा पध्दतीने नोंदीमध्ये बदल करण्याची प्रथा सुरु राहिल्यास खच्या मागावर्गीयांस न्याय देणे शक्य होणार नाही. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखल्यात खाडाखोड / अक्षरबदल / पुनर्लेखन अशा प्रकारे कोणताही बदल मुख्याध्यापक यांनी करु नये अशा प्रकारच्या सूचना आपल्या स्तरावरुन आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. तसेच अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितावर आवश्यक ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची गांभिर्यपूर्वक नोंद घ्यावी.

शबनम मुजावर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सातारा जिल्हा परिषद सातारा

प्रत :-१) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना माहितीसाठी सविनय सादर

२) मा. संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांना
माहितीसाठी सविनय सादर...

Post a Comment

0 Comments