जि.प. उपकरातून जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-2026 साठी प्राथमिक, माध्यमिक व विशेष शिक्षकांचे प्रस्ताव सादर करणे बाबत.दिनांक:- 04/06/2005

जि.प. उपकरातून जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-2026 साठी प्राथमिक, माध्यमिक व विशेष शिक्षकांचे प्रस्ताव सादर करणे बाबत.
दिनांक:- 04/06/2005

वरील विषयी आपणांस कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णयाचे अनुषंगाने जि.प. उपकरातून जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-2026 साठी निवड करण्याच्या दृष्टीने आपल्या तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदरचे प्रस्ताव दि.30/06/2025 पुर्वी खालील ठरवून दिलेल्या आधारावर प्रपत्र 1 ते 8 मध्ये दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावेत. आपल्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सदरचे प्रस्ताव मा.प्रशासक/अध्यक्ष जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्षतेखालील निवड समिती समोर ठेवून पात्र शिक्षकांची निवड करावयाची आहे व निवड झालेल्या शिक्षकांची यादी मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचेकडे सादर करावयाचे आहेत. तसेच सदरचे पुरस्कार दिनांक 05 सप्टेंबर या शिक्षकदिनी वितरित करावयाचे असल्यामुळे आपण किमान तालुकानिहाय माध्यमिक 04 प्राथमिक 04 व विशेष शिक्षक 01 असे परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 30/06/2025 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत. तसेच आपण आपल्या कार्यालयास प्राप्त होणा-या परिपुर्ण प्रस्तावांची तपासणी करूनच या कार्यालयास सादर करावेत.

१) शिक्षकांचा स्थानिक समाजातील लौकीक.

२) शिक्षकांची शैक्षणिक कार्यक्षमता व त्याच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न,

३) विदयार्थ्यांविषयी शिक्षकांची वाटणारी आत्मीयतां आणि जिव्हाळा याबाबतची माहिती.

४) शिक्षकांचा सामाजिक कार्यात सहभाग.

५) पुरस्कारासाठी शिक्षकांची सेवा 10 वर्ष पुर्ण व मुख्याध्यापकासाठी 10 वर्ष पुर्ण असणे आवश्यक.

६) शिक्षकांचे गोपनीय अहवाल व चारित्र्य चांगले असावे.

७) सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये.

८) शिक्षकांचे उल्लेखनीय लिखानात्मक कार्य.

९) शिफारस केलेल्या शिक्षकांचे वर्तणुकीबाबत दाखला देण्यात यावा व हे तपासण्याची जबाबदारी

गटशिक्षणाधिकारी यांची राहील तसेच पोलीस स्टेशनचे, गुन्हा केलेला नसल्याचे प्रमाणपत्र असावे.

. १०) ज्या शिक्षकांना यापूर्वी जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे अशा शिक्षकांचे प्रस्ताव सादर करू नये. ११) पुरस्कारासाठी चित्रकला/हस्तकला/संगीत शिक्षक/शारीरिक शिक्षक/अपंग शिक्षक यांचेही प्रस्ताव सादर
करावेत.

१२) शिक्षकांचे प्रस्ताव सादर करतांना शिक्षकांचे महत्वाचे कागदपत्रे, प्रमाणपत्रे संच व्यवस्थित लावून एकत्रित जोडावे व त्याप्रमाणे प्रत्येकाचा एक संच करावा व त्यावर गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. मुळ कागदपत्रे जोडू नयेत साक्षांकित प्रती जोडाव्यात.

१३) शिक्षकांच्या शिफारसी योग्य तपासणी करूनच प्रस्ताव सादर करावेत. पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेवर टिका होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे झाल्यास याप्रकरणी संपूर्ण जवावदारी गटशिक्षणाधिकारी यांचेवर राहील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी.

१४) गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांचे तालूक्यातून 04 प्राथमिक, 04 माध्यमिक व 01 विशेप शिक्षकांचे प्रस्ताव सादर करावेत.

१५) पुरस्काराचं प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत गटविकास अधिकारी/सभापती पंचायत समिती, यांचे संमतीने सादर करावेत.

१६) केवळ शासकीय अधिकारी (राजपत्रित) किंवा निमशासकीय संस्थांनी दिलेले प्रमाणपत्र जोडावे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडू नये.

१७) प्रस्तावासांवत जोडलेली कागदपत्रे, प्रशस्तीपत्र, राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेले असावे,

१८) कुटुंब कल्याण शस्रक्रियेसाठी प्रवृत्त केल्यावावत खाजगी दवाखान्याची प्रमाणपत्रे सोवत जोडू नयेत. तसेच प्रपत्रातील कोणतीही माहिती संबंधित शिक्षकांकडून भरून न घेता शाळेच्या मुख्याध्यापकाकडून भरून घ्यावी. सदर प्रस्ताव संगणकीकृत व विहित मुदतीत सादर करावेत.

(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

प्रतिलिपी :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सविनय सादर.
-(जयश्री चहाण)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments