सन 2024-25 च्या यु-डायस प्लस माहितीमध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पट असलेल्या शाळांची माहिती तपासणी करून सदर शाळा नजीकच्या प्रा शा मध्ये एकत्रिकरण करता येईल किंवा कसे याबाबत अहवाल सादर करणे बाबत...दि.२५/६/२०२५

विषय:- सन 2024-25 च्या यु-डायस प्लस माहितीमध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पट असलेल्या शाळांची माहिती तपासणी करून सदर शाळा नजीकच्या प्रा शा मध्ये एकत्रिकरण करता येईल किंवा कसे याबाबत अहवाल सादर करणे बाबत...

संदर्भ:- मा.राज्य प्रल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी दिनांक 19/06/2025 रोजी संगणक प्रोग्रामर यांच्या बठकीत दिलेल्या सूचना.

जाक्र/जिपधा/संगणक/66/2025. समग्र शिक्षा, जिल्हा परिषद धाराशिव.
दिनांक :- 25/06/2025.
प्रति,
गटशिक्षणाधिकारी (सर्व) पंचायत समिती भूम, कळंब, लोहारा, उमरगा, धाराशिव, परंडा, तुळजापूर, वाशी

जिल्हा धाराशिव.
वरील संदर्भीय विषयी आपणास कळविण्यात येते की, सन 2024-25 मध्ये युडायस प्लस प्रणालीमध्ये संगणकीकृत करण्यात आलेली शाळांची सांख्यिकी माहितीनुसार जिल्हयातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या 10 किंवा १० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या 51 शाळा दिसून आल्या आहेत.

सदरील शाळांची पडताळणी आपल्या स्तरावरून दिनांक 30/06/2025 पर्यंत पूर्ण करुन घ्यावी. तपासणीमध्ये सदरील शाळा नजीकच्या कोणत्या शाळेत मर्ज (एकत्रिकरण) करता येईल किंवा एकत्रिकरण करण्यास कांही अडचण आहे या बाबत आपले स्वंयस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास युनिकोड फाँटमध्ये दिनांक 01/07/2025 रोजी सादर करावी. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.

सोंबत: 51 शाळांची यादी.

(नागेश मापारी) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) समग्र शिक्षा जिल्हा परिषद धाराशिव

प्रतिलीपी:- माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव.

Post a Comment

0 Comments