संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
निवृत्तीवेतन धारकांना आवाहन
संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच राज्यातील सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्कत भ्रमणध्वनीद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येत नाही, तसेच ऑनलाईन अॅपव्दारे निवृत्तीवेतनधारकांची किंवा निवृत्तीवेतनाची माहिती मागविली जात नाही. सर्व आर्थिक बाबीं विषयी कोषागार कार्यालयामार्फत पत्र व्यवहार केला जातो. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी फोन पे /गूगल पे / ऑनलाईन रक्कम भरण्याच्या कोणत्याही भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या भूलथापांना कृपया बळी पडू नये. तसेच कोणत्याही कोषागार कार्यालयामार्फत आपल्या घरी कोणालाही पाठवले जात नाही. अशा प्रकारे दूरध्वनी आल्यास त्याबाबतची माहिती आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या संबंधित कोषागार कार्यालयास कळवावी. कोणत्याही आमिषास आपण बळी पडू नये. तसेच कोणत्याही शंकेबाबत प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.
दिनांक 30/5/2025
puyAddl. Treasury Officer(Pension)
Satara.
0 Comments