विषयः- आदिवासी विदयार्थ्याची शालेय नोंद रजिस्टर क्र.१ मधील नोंदीबाबत...
संदर्भ:-
१. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का. १०/मंत्रालय विस्तार, मुंबई दि. १२ जानेवारी २०००
२. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, परिपत्रक क्र. पीआरइ १०९९ / २०१४/प्राशि-१/दि. ०९. ०२. २०००
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी शाळांमध्ये आदिवासी विदयार्थ्यांच्या जात / पोट जात या बाबत शालेय नोंद रजिस्टर क्र. १ मध्ये घेतल्या जातात. सदर नोंद रजिस्टर क्र.१ नुसार शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात/पोट जात सदरीमध्ये हिंदू महादेव कोळी / हिंदू-कोळी महादेव, हिंदु-भिल्ल, हिंदु-ठाकुर, हिंदु-कोकणा. हिंदु-वारली, हिंदु-कातकरी अशी नोंद सरासरी घेतली जाते, याबाबत सदरची नोंद ह्या चुकीच्या नामाभिधानाने घेतल्या जातात व अशा नोंदी भविष्यात जातीचा दाखला/जात वैधता प्रमाणपत्र काढण्याकरीता सदर नोंदी वैध समजल्या जात नाहीत. भविष्यात आदिवासी विद्यार्थाचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने सदरबाबतीत नोंद करताना अनुसुचित जमातीपुढे धर्माचा उल्लेख न करणेबाबत संदर्भ क्र. १ व २ नुसार कार्यवाही करून योग्य जातीची नोंद करावी.
(बाळासाहेब राक्षे) शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, ठाणे
प्रत माहितीस्तव :
श्री. अंकुश खटेले
0 Comments